दहशतवादावरुन घनींचा पाकिस्तानवर थेट हल्ला

वृत्तसंस्था
रविवार, 4 डिसेंबर 2016

पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या विकासाकरिता 50 कोटी डॉलर्सचा निधी देण्याचे वचन दिले आहे. श्रीयुत अझीझ, त्या निधीचा वापर दहशतवाद रोखण्याकरिता होऊ शकतो. अफगाणिस्तानमध्ये या वर्षी सर्वाधिक जीवितहानी झाली आहे. हे सहन करणे सर्वथा अशक्‍य आहे. (

नवी दिल्ली - पंजाबमधील अमृतसर येथील "हार्ट ऑफ एशिया' परिषदेस संबोधित करताना अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनी "सीमेपलीकडून उत्तेजन देण्यात येत असलेल्या दहशतवादासंदर्भात' पाकिस्तानला कडक शब्दांत इशारा दिला.

सीमपलीकडील दहशतवाद ही अत्यंत गंभीर समस्या असून दहशतवादाविरोधात लढण्यासाठी आम्हाला मदतीची आवश्‍यकता असल्याचे घनी यांनी स्पष्ट केले. घनी यांच्या या भाषणावेळी पाकिस्तानचे परराष्ट्र संबंध सल्लागार सरताज अझीझ हेदेखील उपस्थित होते. अझीझ यांना थेट संबोधित करत घनी यांनी पाकिस्तानला हा इशारा दिला.

"सीमेपलीकडील दहशतवादाची समस्या ओळखणे अत्यंत आवश्‍यक आहे. दहशतवादाच्या या धोक्‍याविरोधात लढण्यासाठी आम्हाला निधीची आवश्‍यकता आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या विकासाकरिता 50 कोटी डॉलर्सचा निधी देण्याचे वचन दिले आहे. श्रीयुत अझीझ, त्या निधीचा वापर दहशतवाद रोखण्याकरिता होऊ शकतो. अफगाणिस्तानमध्ये या वर्षी सर्वाधिक जीवितहानी झाली आहे. हे सहन करणे सर्वथा अशक्‍य आहे. (मात्र) काही देश अद्यापी दहशतवाद्यांना आश्रय देत आहेत. एका तालिबानी नेत्याने नुकतेच सांगितल्यानुसार पाकिस्तानमध्ये आश्रय मिळाला नाही; तर ते एक महिनाभरसुद्धा लढू शकणार नाहीत. मला कोणाला दोष द्यावयाचा नाही; मात्र स्पष्टीकरण हवे आहे,'' असे घनी म्हणाले.

भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हार्ट ऑफ एशियास संबोधित करताना दहशतवादाच्या मुद्यावर विशेष भर दिला होता. या पार्श्‍वभूमीवर घनी यांनीही दहशतवादासंदर्भात मांडलेली ही रोखठोक भूमिका अत्यंत संवेदनशील मानली जात आहे.

ग्लोबल

वॉशिंग्टन: भारताकडून धोका निर्माण होत असल्याचा कांगावा करत पाकिस्तानकडून जाणीवपूर्वक दहशतवादाला खतपाणी घातले जात असून, ते तात्काळ...

07.27 AM

ऍमेझॉनच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी पाऊल सॅनफ्रान्सिस्को: गुगल आणि वालॅमार्ट यांनी ई-कॉमर्समध्ये भागीदारी केली असून,...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017

जेद्दाह - सौदी अरेबियाची राजधानी असलेल्या जेद्दाह येथील रस्त्यावर एका लोकप्रिय...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017