स्टॉकहोममध्ये दहशतवादी हल्ला?:3 ठार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

हा ट्रक धडकाविण्यात आलेल्या एका प्रसिद्ध "डिपार्टमेंट स्टोअर'मधून धुराचे लोट येत असल्याचेही निष्पन्न झाले आहे. या घटनेमध्ये आणखी नागरिकही जखमी झाल्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आली आहे

स्टॉकहोम - स्वीडनची राजधानी असलेल्या स्टॉकहोम शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये घुसविण्यात आलेल्या एका ट्रकने तीन नागरिकांना चिरडल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे.

याचबरोबर, या भागामध्ये गोळीबार झाल्याचेही स्वीडीश माध्यमांनी म्हटले आहे. या भागामधील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आहे. हा ट्रक धडकाविण्यात आलेल्या एका प्रसिद्ध "डिपार्टमेंट स्टोअर'मधून धुराचे लोट येत असल्याचेही निष्पन्न झाले आहे. या घटनेमध्ये आणखी नागरिकही जखमी झाल्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आली आहे.

शहरामधील एक मुख्य रस्ता असलेल्या "क्वीन स्ट्रीट'वर ही घटना घडली आहे. हा दहशतवादी हल्ला असण्याची दाट शक्‍यता आहे.

Web Title: Terror attack in Stockholm?; 3 dead