दहशतवादी हल्ल्यात स्टॉकहोममध्ये दोन ठार

वृत्तसंस्था
शनिवार, 8 एप्रिल 2017

'आम्ही स्वीडनमधील भारतीय राजदूताच्या संपर्कात आहोत. हा हल्ला भारतीय दूतावासाच्या अगदी जवळ झाला आहे. आमचे अधिकारी सुरक्षित आहेत', अशी माहिती भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे.

स्टॉकहोम - सेंट्रल स्टॉकहोम येथे गर्दी असलेल्या भर बाजारातील दुकानामध्ये ट्रक घुसल्याने दोन जण ठार झाले.

हा दहशतवादी हल्ला असल्याचे स्वीडनच्या पंतप्रधानांनी म्हटले आहे. दरम्यान, स्वीडिश रेडिओने मात्र, या घटनेत तीन जण ठार झाल्याचे म्हटले आहे. या घटनेनंतर स्वीडिश पोलिसांनी घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलिस; तसेच तातडीची सेवा करणारी पथके दाखल झाली. शहरातील सर्वांत मोठ्या पादचारी मार्गावर असलेल्या एका दुकानात हा ट्रक घुसला. त्यानंतर परिसरात प्रचंड धूर पसरला होता. त्यामुळे घटनास्थळावर काय चालले आहे ते हेलिकॉप्टरमधूनही दिसत नव्हते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून, भारत स्वीडनच्या नागरिकांबरोबर असल्याचे म्हटले आहे.

स्वीडनमधील भारतीय दूतावासाने या हल्ल्यात कोणी भारतीय जखमी झाले असल्यास कळविण्याचे आवाहन ट्‌विटरद्वारे केले आहे. त्यासाठी दूरध्वनी क्रमांकही जाहीर केले आहे.

दरम्यान "आम्ही स्वीडनमधील भारतीय राजदूताच्या संपर्कात आहोत. हा हल्ला भारतीय दूतावासाच्या अगदी जवळ झाला आहे. आमचे अधिकारी सुरक्षित आहेत', अशी माहिती भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे.

Web Title: Terrorist attack in Sweden two killed