फ्रान्समध्ये गोळीबारात तिघे जखमी

वृत्तसंस्था
शनिवार, 25 मार्च 2017

या गोळीबारामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गोळीबारानंतर फ्रान्समधील प्रमुख शहरांमध्ये अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

पॅरिस - उत्तर फ्रान्समधील लिली शहरात शुक्रवारी रात्री झालेल्या गोळीबारात तिघेजण जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लिली शहरातील पोर्ट डि-अॅरास मेट्रो स्थानकाजवळ शुक्रवारी रात्री एका अज्ञात व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये एक अल्पवयीन मुलासह 3 जण जखमी झाले आहेत. हा दहशतवादी हल्ला नसून स्थानिक गुन्हेगारांनेच हा गोळीबार केल्याची शक्यता आहे. 

या गोळीबारामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गोळीबारानंतर फ्रान्समधील प्रमुख शहरांमध्ये अलर्ट घोषित करण्यात आला आहे. फ्रान्समध्ये टोळीयुद्धातून अनेकवेळा गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत.