राज शहा ट्रम्प प्रशासनात महत्त्वाच्या पदावर

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 जानेवारी 2017

वॉशिंग्टन- अमेरिकेचे नवनिर्वाचित डोनाल्ड ट्रम्प यांनी मूळ भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक राज शहा यांची व्हाईट हाऊसमधील महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली आहे. 

ट्रम्प यांचे उपसहायक आणि संपर्क उपसंचालक व संशोधक संचालक म्हणून शहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अध्यक्षांच्या 'ट्रांझिशन टीम'ने याबाबतची घोषणा केली असून, वयाच्या केवळ तिशीत असलेल्या राज यांना यामुळे ट्रम्प यांच्यासोबत काम करण्याची आणखी मोठी संधी मिळाली आहे. शहा यांचे आई-वडील गुजरातमधून अमेरिकेत स्थलांतरित झाले होते. 

राज शहा हे सध्या रिपब्लिकन राष्ट्रीय समितीच्या 'अपोझिशन रिसर्च'चे प्रमुख आहेत. ट्रम्प यांच्या प्रतिस्पर्धी व डेमॉक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्याविरोधात संशोधन करणाऱ्या पथकाचे नेतृत्व शहा यांनी केले होते. अध्यक्षीय निवडणुकीत क्लिंटन यांच्या विरोधातील संपूर्ण प्रचारामागे शहा होते.