'ट्रम्प कॉल' : पंतप्रधान मोदींशी आज रात्री ट्रम्प करणार चर्चा

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 जानेवारी 2017

वॉशिंग्टन- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताचे पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आज (मंगळवार) रात्री साडेअकरा वाजता फोनवरून चर्चा करणार आहेत, अशी माहिती व्हाईट हाऊसने दिली आहे. 

व्हाईट हाऊसच्या वतीने ट्रम्प यांचे आजचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामध्ये अध्यक्ष ट्रम्प यांची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा होणार असल्याचे म्हटले आहे. वॉशिंग्टनमधील स्थानिक वेळेनुसार दुपारी एक वाजता म्हणजेच भारतीय प्रमाणवेळेनुसार साडेअकरा वाजता ते मोदींना फोन करणार आहेत. 

ट्रम्प यांनी 20 जानेवारी रोजी अध्यक्षपदाची शपथ घेतल्यापासून परदेशातील नेत्यांशी फोनवरून चर्चा केली. त्यामध्ये मोदी हे पाचवे नेते आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडू आणि मेक्सिकोचे प्रमुख पेना नीतो यांच्याशी 21 जानेवारी रोजी, तर इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह एल-सिसी यांच्याशी 22 जानेवारी रोजी फोनवरून ट्रम्प यांनी चर्चा केली.