ट्रम्प यांचे समर्थन केल्याने दिला घटस्फोट

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

लॉस एंजिलिस- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थन केल्यामुळे चिडलेल्या पत्नीने आपल्या पतीला घटस्फोट दिल्याची घटना येथे घडली आहे.

लॉस एंजिलिस- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थन केल्यामुळे चिडलेल्या पत्नीने आपल्या पतीला घटस्फोट दिल्याची घटना येथे घडली आहे.

कॅलिफोर्निया येथील कारागृहामधून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी गेल मॅककॉर्मिक (वय 73) यांनी सांगितले की, 'माझे पती बिल मॅककॉर्मिक (वय 77) यांनी आपल्या मित्रांना ट्रम्प यांना मतदान करण्यास सांगितले होते. पतीच्या निर्णयाचा मला राग आला होता. गेल्या 20 वर्षांपासून आम्ही एकत्र राहात आहोत. घटस्फोटाचा निर्णय घेताना वाईट वाटले. परंतु, पतीने ट्रम्प यांचे समर्थन केलेले आवडले नाही. आम्ही समुपदेशकाकडे सुद्धा गेलो होतो. यावेळी पतीने ट्रम्प यांना मतदान न केल्याचे सांगितले. पण ट्रम्प हा विषय आमच्या नात्यात त्रासदायक ठरू लागल्याने घटस्फोटाचा निर्णय घ्यावा लागला.'

'माझे पती ट्रम्पच्या प्रत्येक गोष्टीचे समर्थन करत होते. आम्ही दोघेही विरुद्ध विचारसरणीचे आहोत. गेल्या 20 वर्षांपासून एकत्र राहात आहोत. परंतु, एकमेकांना सांभाळून घेत होतो. ट्रम्प यांच्या विषयावर एकमत होऊ शकले नाही. दोघेही माघार घेण्यास तयार नव्हतो. माझे पती व ट्रम्प यांची सन 1980च्या दरम्यान ओळख झाली होती. दोघेहे त्यावेळी कारागृहात कैद होते,' असेही गेल मॅककॉर्मिक यांनी सांगितले.