मल्ल्यांवर कारवाईचा बडगा; ललित मोदींचा नंबर कधी?

Vijay Mallya Lalit Modi
Vijay Mallya Lalit Modi

लंडन: नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात पसार झालेले मद्यसम्राट विजय मल्ल्या यांच्याविरोधात ब्रिटनमध्ये कारवाई सुरू झाल्यानंतर आता कारवाईच्या यादीत ललित मोदींचा नंबर कधी येणार, याकडे भारतीय यंत्रणांचे लक्ष असेल.

मल्ल्या यांच्या तुलनेत ललित मोदी यांच्यावर कारवाई करण्यात जास्त अडथळे येण्याची शक्यता आहे. कारण, काही दिवसांपूर्वीच 'इंटरपोल'ने त्यांच्याविरुद्धची 'रेड कॉर्नर' नोटीसही रद्द केली होती.

मल्ल्यांना अटक आणि जामीनही..!
'किंगफिशर'चे मालक विजय मल्ल्यांना ब्रिटिश पोलिसांनी लंडनमध्ये अटक केली. या कारवाईमुळे मल्ल्यांना भारतात परत आणण्यासाठी सुरु असलेल्या सरकारच्या प्रयत्नांना लवकरच यश मिळण्याची शक्यता आहे. मात्र, अटकेनंतर तीन तासांमध्येच मल्ल्या यांना जामीन मंजूर करण्यात आला.

विजय मल्ल्या यांच्यावर सध्या बँकांचे कर्ज थकविल्यांसदर्भात तसेच इतर अनेक आर्थिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज थकवित मल्ल्या यांनी गेल्या वर्षी लंडनमध्ये मुक्काम ठोकला होता. त्यांच्यावर सुरु असलेल्या खटल्यांसाठी त्यांना कित्येकदा न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतू त्यांनी प्रत्येक वेळेला काहीतरी सबब देऊन ही उपस्थिती टाळली. मल्ल्यांच्या वकीलांनी त्यांच्या अनुपस्थितीचे कारण दिले होते की, मल्ल्या भारतात येण्यास तयार आहेत. परंतु, भारत सरकारने त्यांचा पासपोर्ट रद्द केल्यामुळे त्यांना भारतात परतणे शक्य नाही. 

भारताने मल्ल्यांच्या 'घर वापसी'साठी ब्रिटनकडे त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. ब्रिटनने ही मागणी मान्य करीत पुढील कारवाई जिल्हा न्यायाधीशाकडे सोपविली होती. परंतु ब्रिटनमध्ये प्रत्यापर्णासाठी क्लिष्ट प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. आरोपीविरोधात वॉरंट जारी करण्याचा अधिकार न्यायाधीशाकडे असतो. वॉरंट जारी झाल्यानंतर प्राथमिक सुनावणी, प्रत्यापर्णासाठी सुनावणी होते. अंतिम निर्णय परराष्ट्र मंत्र्यांवर अवलंबून असतो. आरोपीला या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयापर्यंत आव्हान देण्याचा अधिकार देतो. 

मल्ल्या यांच्याकडे सार्वजनिक बँकांचे 8 हजार 191 कोटी रुपयांचे कर्ज 31 डिसेंबर 2016 पर्यंत थकीत आहे. यातील केवळ 155 कोटी रुपयांचे कर्ज बॅंकांनी मल्ल्या याच्या जप्त मालमत्तांचा लिलाव करून वसूल केले आहे. बॅंका कर्ज वसुलीसाठी मल्ल्या याच्या मालमत्तेच्या लिलावासह सर्व उपाययोजना करत आहेत, अशी माहिती अर्थ राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांनी गेल्या महिन्यात दिली होती.

या वर्षी जानेवारीमध्ये मल्ल्यांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. बँकांशी 'रास्त' किंमतीत तडजोड करु, असे विजय मल्ल्या यांनी लंडनमधील वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखातीत म्हटले होते.

ललित मोदींचं काय..?
'इंडियन प्रीमियर लीग'चे (IPL) माजी अध्यक्ष ललित मोदी यांच्यावर आंतरराष्ट्रीय पोलिस यंत्रणा म्हणजे इंटरपोलने कृपादृष्टी दाखवत त्यांच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीसही रद्द केली आहे. 

'कमिशन फॉर द कंट्रोल ऑफ फाईल्स'ने (CCF) दिलेल्या आदेशांचा अभ्यास सक्तवसुली संचालनालयातर्फे करण्यात येत आहे. त्यानुसार सरकार दरबारी या प्रकरणासंदर्भात भूमिका मांडण्यात येणार आहे.

इंडियन प्रीमियर लीग हा 2009 मध्ये क्रीडा जगतातील सर्वांत किमती ब्रँड्समध्ये सहाव्या क्रमांकावर पोचला होता. त्यावेळी IPL ची 'बँड व्हल्यू' 160 कोटी डॉलर एवढी होती. मँचेस्टर युनायटेड आणि फेरारी यांनाही IPL'ने मागे टाकले होते. त्या दोन्ही बँडची किंमत अनुक्रमे 150 कोटी आणि 155 कोटी डॉलर होती. 

दरम्यान, या स्पर्धेचे वलय आणि ब्रँडची किंमत कमी  होत असल्याची टीका सोशल मीडियावर होत आहे. त्याला उत्तर देताना 'माझ्या कार्यकाळात तो ब्रँड वरच्या स्थानावर होता,' असा दावा ललित मोदी यांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com