भारतीय वंशाच्या डॉक्‍टरचा अमेरिकेत भोसकून खून

वृत्तसंस्था
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

वॉशिंग्टनः भारतीय वंशाचे डॉक्‍टर अच्युत रेड्डी (वय 57) यांचा अमेरिकेत त्यांच्या भारतीय वंशाच्याच पेशंटने चाकूने भोसकून खून केला. मूळचे तेलंगणचे असलेले रेड्डी मनोविकारतज्ज्ञ होते.

कन्सास राज्यातील पूर्व विचीटा शहरातील त्यांच्या क्‍लिनिकबाहेरच बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. पोलिसांनी सांगितले, ""या प्रकरणी उमर रशीद दत्त (वय 21) याला अटक करण्यात आली आहे. रेड्डी यांच्यावर आरोपीने चाकूने अनेक वार केले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृत्यूमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.''

पोलिसांनी सांगितले, की उमर हा रेड्डी यांचा पेशंट होता. बुधवारी सायंकाळी तो त्यांना भेटायला आला होता. थोडा वेळ भेटून तो गेला व पुन्हा आला. त्या वेळी क्‍लिनिकमध्ये गोंधळाचा आवाज आल्याने तेथील अधिकारी धावत आली व तिने हल्लेखोराला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रेड्डी यांना कार्यालयातून बाहेर पळून जाता आले. मात्र हल्लेखोराने त्यांचा पाठलाग करीत त्यांच्यावर वार केले. उमर हा विचीटा विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आहे.''

डॉ. रेड्डी यांनी 1986 मध्ये उस्मानिया विद्यापीठातून शिक्षण घेतले. कन्सास विद्यापीठाच्या मेडिकल सेंटरमध्ये ते 1998 मध्ये रुजू झाले होते.