मोदींना कसे उत्तर द्यायचे ते आम्ही दाखवून देऊ : इम्रान खान

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

इम्रान खान यांनी शरीफ यांच्या अकार्यक्षमतेवरही ताशेरे ओढले. शरीफ हे कारभार चालवण्याच्या दृष्टीने अकार्यक्षम आहेत. पाकिस्तानचा चेहरा म्हणून लष्करप्रमुख राहील यांच्याकडेच पाहिले जाते, असेही इम्रान खान यांनी सांगितले.

कराची : भारतीय लष्कराने बुधवारी रात्री पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केले. भारतीय लष्कराने आज दहशतवाद्यांचे सात तळ उध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानातील राजकारण चांगलेच तापले आहे. भारतीय लष्कराच्या आधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन या हल्ल्याची माहिती दिली. त्यानंतर पाकिस्तानचे लष्करी अधिकारी आणि नेत्यांकडून "भारताला योग्य प्रत्युत्तर देऊ, अशा थाटाच्या वल्गना केल्या गेल्या. 

अशा वल्गना करणाऱ्यांमध्ये पाकिस्तानी माजी क्रिकेटपटू तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांची भर पडली आहे. ""नवाज शरीफ यांना मी नरेंद्र मोदींना कसे उत्तर द्यायचे, हे दाखवून देईन,‘‘ असे इम्रान खान यांनी डॉन वृत्तपत्राशी बोलताना म्हटले आहे. 

इम्रान खान यांच्या नेतृत्त्वाखाली उद्या पाकव्याप्त पंजाब प्रांतातील रायविंड येथे मोर्चा निघणार आहे. पाकिस्तानच्या सर्व प्रांतातील लोकांनी या मोर्चात सहभागी व्हावे,असे इम्रान खान यांनी यावेळी सांगितले. 