एक सैनिक मारला तर भारताचे तीन मारू: पाक

वृत्तसंस्था
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016

इस्लामाबाद (पाकिस्तान) - "भारताने जर पाकिस्तानचा एक सैनिक मारला तर त्या बदल्यात भारताचे तीन सैनिक मारण्यात येतील', अशी पोकळ धमकी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांनी दिली आहे.

इस्लामाबाद (पाकिस्तान) - "भारताने जर पाकिस्तानचा एक सैनिक मारला तर त्या बदल्यात भारताचे तीन सैनिक मारण्यात येतील', अशी पोकळ धमकी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांनी दिली आहे.

जम्मू-काश्‍मिरमध्ये वेळोवेळी शस्त्रसंधीचा भंग करत गोळीबार करून तणाव निर्माण करणाऱ्या पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताविरूद्ध गरळ ओकली आहे. शुक्रवारी पाकिस्तानच्या संसदेत बोलताना असिफ यांनी भारताला पोकळ इशारा दिला आहे. "निवडणुकीमध्ये जनतेचा पाठिंबा मिळावा म्हणून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत सरकार जाणीवपूर्वक परिस्थिती तणावजन्य करत आहे. पाकिस्तानमधील दहशतवादामागे भारताचा हात असून त्यासंदर्भातील पुरावेही आहे' असा दावा त्यांनी केला. तसेच "त्यासंदर्भातील कागदपत्रे आणि व्हिडिओ फिल्म आम्ही संयुक्त राष्ट्राकडे पाठविली असून इतर देशांना पाकमधील दहशतवादामागे भारताचा हात असल्याचे दाखवून देणार आहोत.

चीन आणि पाकिस्तानमधील आर्थिक संबंधांमध्येही भारत अडचणी निर्माण करत आहे' असा आरोपही असिफ यांनी केला. 'आज जरी पाकिस्तान भारतापेक्षा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असला तरीही चीन सोबतच्या काही आर्थिक प्रकल्पांमुळे इस्लामाबाद अधिक मजबूत होणार आहे', असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

ग्लोबल

सोल : कोरिया द्विपकल्पात कोणत्याही प्रकारचे युद्ध होणार नाही, असे दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जी इन यांनी म्हटले आहे. उत्तर...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

हैदराबाद - हैदराबाद येथील एका महिलेचा सौदी अरेबियामध्ये मानसिक व लैंगिक छळ केला...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

वॉशिंग्टन- काश्मीरमधील दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिदीनला अमेरिकेने परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. अमेरिकेचे...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017