माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यातील काही क्षणचित्रे...

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी (वय 93) यांचे आज (गुरुवार) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांना गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालविली. 

घणाघाती वक्तृत्वाने श्रोत्यांची मने जिंकणारे, देशप्रेमाने ओथंबलेल्या अंतःकरणाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात देशहितासाठी आपल्या ध्येयधोरणाचे प्रतिबिंब उमटवू पाहणारे व्यक्तीमत्त्व म्हणजे अटलबिहारी वाजपेयी. 

वाजपेयी यांनी राजकारणात आपले अढळपद निर्माण केले, कार्यकर्त्यांच्या मनावर अधिराज्य केले. तितक्‍याच सहजतेने त्यांनी साहित्याच्या प्रांतात मुशाफिरी केली. आपल्या साहित्यिक कारकिर्दीची मोहर उमटवली. त्यांच्या आयुष्यातील काही क्षणचित्रे...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com