रांचीत ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व

शुक्रवार, 17 मार्च 2017

रांची: भारताविरुद्धच्या तिसर्‍या क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४५१ धावांत संपुष्टात आला.

रांची: भारताविरुद्धच्या तिसर्‍या क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४५१ धावांत संपुष्टात आला.

कर्णधार स्टीव्ह स्मिथचे दमदार शतक आणि कसोटीत पुनरागमन करणार्‍या ग्लेन मॅक्सवेलचे पहिले शतक हे ऑस्ट्रेलियाच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले. मॅक्सवेलने आज (शुक्रवार) कसोटीतील पहिले शतक झळकाविले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीनही प्रकारांमध्ये शतक झळकाविणारा मॅक्सवेल हा ऑस्ट्रेलियाचा दुसराच फलंदाज आहे. याआधी शेन वॉटसनने ही कामगिरी केली होती. स्मिथ-मॅक्सवेलची जोडी फुटल्यानंतर यष्टिरक्षक मॅथ्यू वेडने काही काळ स्मिथला साथ दिली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या उर्वरित विकेट्स भारताने झटपट काढल्या.

भारताकडून रवींद्र जडेजाने पुन्हा एकदा डावात पाच बळी घेण्याची कामगिरी केली. उमेश यादवने न थकता भेदक गोलंदाजी केली. त्याला तीन विकेट्स मिळाल्या.

क्रीडा

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनी याची '...

08.03 PM

लंडन : इंग्लंडकडून पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजचा पराभव झाल्यामुळे आता श्रीलंकेचा संघ 2019 मध्ये होणाऱ्या विश्‍...

02.09 PM

सुवर्ण लक्ष्य साधण्यासाठी आहारासह प्रशिक्षणाचा सर्व खर्च उचलणार पुणे - प्रतिकूल परिस्थितीला ‘पंच’ देऊन बॉक्‍सिंगमध्ये कारकीर्द...

09.15 AM