जळगाव भोईटेनगर उड्डाणपुलाचा मुहूर्त सापडला

अडचणीची ठरणारी रेल्वे वसाहत पाडण्याचे काम सुरू
bhoite nagar jalgaon
bhoite nagar jalgaonsakal

जळगाव : भोइटेनगरसह पिंप्राळा, हुडको परिसरातील अनेक वर्षांपासून मागणी असलेला भोईटेनगर रेल्वे उड्डाणपुलाचा मुहूर्त अखेर सापडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून अहमदाबाद येथील मीनर इन्फ्रा कंपनीचे अभियंते व कर्मचारी पुलाच्या कामासाठी संपादीत केलेली जागा शोधून त्यावर खुणा करण्याचे काम करीत आहे. पुलाच्या कामात अगोदर पिलर्स उभारण्यात येतील. त्यासाठी कठीण दगड किती खोलवर आहे, याचा शोध घेण्यात येणार असल्याचे मिनर कंपनीच्या अभियंत्यांनी सांगितले. दीड वर्षाचा कालावधी पूल उभारणीसाठी लागणार आहे.

भोईटेनगर रेल्वे उड्डाणपूल ८५० मीटर लांब व १२ मीटर रुंद असेल. त्याचे अठरा पिअर असतील. त्यावर गडर्रच्या माध्यमातून पुल उभारण्यात येणार आहे. त्यात दोन अॅम्यूटमेट पिअर व तेरा गर्डर राहणार असतील. २० मीटरचे सिमेंटचे, ४५ मीटरचा १ स्टीलचा, ३७ मीटरचे दोन स्टीलचे, ३१ मीटर लांबीचे दोन, २५ मीटर लांबीचे दोन स्टीलचे गडर्र असतील. दोन्ही बाजूला सिमेंटची संरक्षक भिंत असेल. जळगाव भोईटेनगर रेल्वे उड्डाणपूल व असोदा रेल्वे गेट उड्डाण पुल असे दोन कामे मीनर कंपनीला मिळाले आहेत.

भोईटेनगर उड्डाणपुलाच्या कामाची सुरुवात झाली असून पूल मार्गात पिअर्स उभारणी करण्यापूर्वी जमिनीत किती खोलवर कठीण दगड आहे, याचा शोध घेण्यासाठी पायलिंग करण्यात येते. हे काम करण्यासाठी पायलिंग मशिन राजस्थान येथील येथून आणण्यात आली आहे. या मशीनचे असेब्लिंगचे काम सुरू आहे. शिवाजीनगर सोबतच कानळदा, आव्हाणे या गावांना जोडणारा रिंगरोड ते शिवाजीनगरातील राजाराम मंगल कार्यालयाच्या दरम्यान हा पुल उभारला जाईल. पुलाच्या मार्गात अडथळा ठरणारे रेल्वे वसाहतीतील निवासस्थाने पाडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com