स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव लोगोचा जळगाव मनपास विसर

यंदाचे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष असून त्यानिमित्त देशभरात हा उत्सव साजरा केला जात आहे.
Jalgaon municipal corporation
Jalgaon municipal corporationesakal

जळगाव : यंदाचे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष असून त्यानिमित्त देशभरात हा उत्सव साजरा केला जात आहे. त्यासाठी विशिष्ट बोधचिन्ह (लोगो) विकसित करण्यात आले असून ते वापरण्यासंबंधी निर्देश असताना जळगाव महापालिकेस मात्र त्याचा विसर पडला आहे.

भारत देश यंदा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. केंद्र व राज्य सरकार त्यानिमित्त विविध कार्यक्रम, उपक्रम राबवित आहेत. तसेच केंद्र व राज्य सरकारांच्या अखत्यारित विविध शासकीय, निमशासकीय विभाग, कार्यालयांना ई-मेल, कार्यालयीन आदेश, परिपत्रक, सूचना आदी पत्रव्यवहार करताना या अमृतमहोत्सवाचा लोगो वापरण्यासंबंधी निर्देश देण्यात आले आहे.

Jalgaon municipal corporation
मनोबलचे दिव्यांग राज्य लोकसेवा परीक्षेत अव्वल

मनपास विसर

असे असताना जळगाव महापालिकेस मात्र हा लोगो वापरण्याचा विसर पडला आहे की, त्याचे वावडे आहे? असा प्रश्‍न उपस्थित होतो. पालिकेच्या बहुतांश पत्रव्यवहारांवर हा लोगो आढळून येत नाही. विशेष म्हणजे, जळगाव जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी व महापालिका उपायुक्तांनीही त्यासंबंधी गेल्या वर्षीच आदेश निर्गमित केले आहेत. तरीही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

Jalgaon municipal corporation
मनपाचे ४३ कर्मचारी एकाच दिवशी झाले निवृत्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com