प्रज्ञाचक्षू संगीतामुळे कोंचीच्या गोसावी कुटुंबाची दिवाळी

प्रशांत कोतकर
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

जळगाव - सर्वत्र दिवाळीची धामधूम असताना ज्ञानरूपी प्रकाशाचं पूजन करून संगीता गोसावी या प्रज्ञाचक्षू तरुणीने कुटुंबासह जीवनातील खरीखुरी दिवाळी साजरी केली. जन्मतःच दोन्ही डोळ्यांनी अंध असणारी संगीता आज स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये स्पर्धा परीक्षेद्वारे अधिकारी बनली आहे.

जळगाव - सर्वत्र दिवाळीची धामधूम असताना ज्ञानरूपी प्रकाशाचं पूजन करून संगीता गोसावी या प्रज्ञाचक्षू तरुणीने कुटुंबासह जीवनातील खरीखुरी दिवाळी साजरी केली. जन्मतःच दोन्ही डोळ्यांनी अंध असणारी संगीता आज स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये स्पर्धा परीक्षेद्वारे अधिकारी बनली आहे.

संगीता ही मूळ संगमनेर तालुक्‍यातील कोंची या गावची. राजीवगीर आणि मैनावती गोसावी यांच्या कुटुंबातील पहिली संतान. वडील गावातील प्रगतशील शेतकरी. संगीताची दुसरी बहीणसुद्धा जन्मतःच अंध. वडिलांनी मुलींची जिद्द समजून घेतली आणि काळासोबत चालायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे जाणलं. संगीताला त्यांनी प्राथमिक शिक्षणासाठी नाशिक येथे पाठविले.

तसेच माध्यमिक शिक्षण जागृती अंध विद्यालय, आळंदी येथे पूर्ण केले. या शाळेत संगीताचे शिक्षक किसन हजारे यांनी संगीताला घडविण्याचे व तिला आत्मविश्वास देण्याचे काम केले. ज्ञानगंगा उच्च माध्यमिक विद्यालय (मासी हिल) आशरी येथे अकरावी, बारावी पूर्ण करताना प्रा. के. पी. डेंगळे यांनी तिला उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केले. पुढे जाऊन संगीताने इंग्रजी विषयात विखे पाटील महाविद्यालय प्रवरानगर येथे पदवी संपादन केली. शिक्षिका होण्याच्या उद्देशाने मुंबई येथे एसएनडीटी महाविद्यालयात बी.एड. पूर्ण केले; परंतु एवढे शिकून नोकरी मिळत नव्हती. नाशिक येथील कार्यक्रमात दीपस्तंभ फाउंडेशनचे संचालक प्रा. यजुर्वेद्र महाजन यांची भेट झाली अन्‌ काहीतरी करण्याची प्रेरणा व दीपस्तंभ मनोबल प्रकल्पाची माहिती मिळाली. वडिलांनी मनोबलला प्रवेशासाठी संमती दिली. या संमतीचं सोनं करीत संगीताने आपल्या जिद्दीने यशाला गवसणी घातली.

काही सुखद

कात्रज - दहीहंडीसाठी होणारा खर्च विधायक कार्याकडे वळविण्याच्या हेतूने कात्रज येथील शिवशंभू प्रतिष्ठानने वेल्हा तालुक्‍यातील...

01.42 AM

पिंपरी: सध्याच्या तरुणाईमध्ये अखंड ऊर्जा आहे. तरुणांनी एकत्र येऊन विधायक कामाचा वसा घेतला, तर ते नक्कीच सामाजिक कार्याचा मोठा...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

औरंगाबादेत तयार झाले लोकोमोटिव्ह स्वच्छतागृह औरंगाबाद - स्वच्छतागृह उभारण्याची किट-किट आता संपली; कारण एका जागेहून दुसऱ्या...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017