माजी विद्यार्थ्यांमुळे पालटतेय ‘एचए’ स्कूलचे रूप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 सप्टेंबर 2016

पिंपरी - केंद्र सरकारचा सार्वजनिक उपक्रम असलेल्या एचए कंपनी कामगार वसाहतीच्या आवारातील पन्नास वर्षे जुन्या शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. तिच्या दुरुस्तीसाठी माजी विद्यार्थी सरसावले असून, आपापल्यापरीने मदत करून शाळेच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्कूलच्या १९९१ मधील दहावीच्या वर्गातील काही विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन दोन जीर्ण वर्ग पुन्हा चकाचक केले आहेत. त्यामुळे शिकणे आणि शिकविणे काहीसे सुलभ झाले असल्याची पावती मुख्याध्यापक एकनाथ बुरसे यांनीही ‘सकाळ’शी बोलताना दिली. 

एचए शाळेत ज्युनिअर केजी ते दहावीपर्यंतचे वर्ग असून, तेथे तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. डेक्कन एज्युकेशन सोसायटीमार्फत दुमजली इमारतीच्या ५६ वर्गखोल्या असलेली ही शाळा चालविली जात आहे. या शाळेचे माजी विद्यार्थी आणि यशवंतनगर येथील व्यावसायिक सचिन बोधनी यांच्या पुढाकारातून शाळेच्या दोन वर्गांचे रूप पालटले आहे. ते १९९१ मध्ये स्कूलमधून दहावी पास झाले होते. त्यांनी आपल्या बॅचच्या इतर विद्यार्थ्यांशी संपर्क साधून शाळेच्या मदतीसाठी सव्वादोन लाख रुपये गोळा केले. त्यात महेश कोळी (अमेरिका) व अतुल देसाई (ऑस्ट्रेलिया) यांनीही खारीचा वाटा उचलला आहे. प्रमोद हिंगे (पुणे), संदीप तावडे यांचेही सहकार्य मिळाले आहे. आता बाके व छतांची दुरुस्ती झाली आहे. तळाला टाइल्स बसविल्या आहेत. नवे पंखे आणि दिवे बसविले आहेत.

काही सुखद

पौडरस्ता - कर्वेनगर येथील ‘स्वराज्याचे शिलेदार’ या गटाने श्रमदानातून शिवकालीन विहीर पुनर्जिवित केली आहे. पुणे-पाबे रस्त्यावर...

03.48 AM

प्राध्यापक दाम्पत्याचा अनोखा उपक्रम ः- आजी-आजोबांना कपडे वाटप धुळे - बाळाची चाहूल लागल्यानंतर सातव्या महिन्यात गर्भवतीचे...

बुधवार, 21 जून 2017

एक लाखाची मदत; पुढील शिक्षणाचा भार उचलणार रत्नागिरी - न्यायदानाचे काम...

बुधवार, 21 जून 2017