झोपडीत शिकलेल्या त्या विद्यार्थ्यांचे लख्ख यश

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

चौकुळ धनगरवाडीतील शाळा - ग्रामस्थ, लोकप्रतिनिधींचे प्रयत्न फळाला
आंबोली - गवताच्या झोपडीत असलेल्या शाळेत शिकलेल्या पंखानी मोठी भरारी घेण्यासाठी उडी घेतली आहे. चौकुळ धनगरवाडी येथील चुरणीच्या मुसमधील शिकणारी ही मुले आता महाविद्यालयात शिक्षण घेणार आहेत. धनगर वाड्यातील या शाळेची आज परिस्थिती बदलली आहे. गवताच्या ठिकाणी सिमेंटचे खांब आले आहेत; मात्र यासर्व प्रवासात शाळेच्या शिक्षकांसह लोकप्रतिनिधी ग्रामस्थांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. ‘सकाळ’ने हा विषय मांडला होता.

ही यशाची गोष्ट आहे चौकुळ चुरणीची मुस येथील शाळेची. नगरवाड्यातील त्या मुलांची शाळा गवताच्या झोपडीत भरत होती. भर पावसात उन्हात कढत त्या मुलांनी शाळेतील दिवस पूर्ण करून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.

चौकुळ चुरणीची मुस येथील धनगरवाडीतील मुलांनी हलाखीच्या परिस्थितीत शिक्षणाची कास धरली. झोपडीतीलच त्यांची वस्ती. तेथेच एक झोपडी उभारून शाळा उभारली आणि अवघ्या पाच मुलांची शाळा सुरू झाली. मिनी अंगणवाडीही सुरू करण्यात आली. आंबोली युनीयन इंग्लिश हायस्कुलची दररोज सहा किलोमीटर सकाळी व सायंकाळी सहा किलोमीटर दिवसा १२ किलोमीटर जंगलवाटेने पायपीट करत चुरणीच्या मुस येथील मुलांनी दहावीच्या परीक्षेत मिळविलेले यश वाखाणण्याजोगे आहे. या वाडीत प्रथम दहावीची परीक्षा पास झाली. यात मुख्य म्हणजे मुलींनी मिळविलेले यश वाखाणण्याजोगे आहे. यात २००८ ला या वाडीतील तीन विद्यार्थ्यांची पहिली बॅच आहे. बनगरवाडी या व्यंकटेश माडगुळकरांच्या कादंबरीतील व्यक्तीरेखाप्रमाणे या शाळेतील विद्यार्थीही आता मोठे झाले आहेत. यंदा दहावीत सोनी जानू कोकरे (६७ टक्के), संगीता कोकरे (४८.२०), गंगू नवलू झोरे (४८) यांनी यश मिळविले. आंबोली हायस्कुलचा नांगरवाकवाडी येथील तुकाराम गणपत पाटील या विद्यार्थ्याने ८७ टक्के गुण मिळवून हायस्कुलमध्ये दुसरा आला आहे.