दीक्षाने दिले सहा जणांना नवजीवन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

अमरावती - शिकण्यासवरण्याच्या वयात तिला आजाराने कवेत घेतले, बळावलेल्या आजारापुढे डॉक्‍टरांनी हात टेकले आणि तिची प्राणज्योत मालवली. आई-वडिलांचे छत्र हरविलेल्या घरात भावांनी प्रेमाने वाढविलेल्या लहान बहिणीच्या निधनाचे दु:ख पचवून तिच्या अवयवदानाचा निर्णय घेतला; आणि तिने एक, दोन नव्हे, तर सहा जणांच्या आयुष्यात प्रकाशाचा किरण पोचवला.

शहरातील डॉ. अविनाश चौधरी यांच्या रुग्णालयात रविवारी (ता.22) दीक्षा प्रदीप मंडपे (वय 25) या युवतीच्या अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. शहरातील हे चौथे अवयवदान होते. त्याकरिता अमरावती ते बेलोरा विमानतळापर्यंत ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. दीक्षा प्रदीप मंडपे हिला बालपणापासूनच मेंदूशी संबंधित आजार होता. नंतरच्या काळात आजाराची तीव्रता कमी झाली होती; मात्र शुक्रवारी (ता.20) अचानक प्रकृती बिघडल्याने तिला डॉ. मनोज निचत यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु ती उपचाराला प्रतिसाद देत नव्हती आणि त्यातच तिचे ब्रेन डेड झाले. त्यानंतर डॉ. निचत यांनी डॉ. अविनाश चौधरी यांना ही बाब सांगतिल्यावर त्यांनी दीक्षाचे भाऊ राहुल व चेतन यांना खरी परिस्थिती सांगत अवयवदानाचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. दोघांनीही दुःख विसरत सामाजिक भावनेतून अवयवदानासाठी होकार दिला आणि डॉ. अविनाश चौधरी यांच्या रुग्णालयात ही प्रक्रिया पार पडली.

हृदय मुंबईला
दीक्षाचे हदय व फुफ्फुस मुंबईच्या फोर्टीस हॉस्पिटलला; तर दोन मूत्रपिंडे नागपूर येथे ऑरेंजसिंटी व वोक्‍हार्ट हॉस्पिटलला सोपविण्यात आल्या. शिवाय तिचे दोन्ही डोळे व त्वचा अमरावतीच्या हरिना नेत्रदान समितीला सोपविण्यात आले.

Web Title: diksha mandape body part donate motivation life saving