सल (कविता)

स्वाती वाघ-यादव, पुणे
मंगळवार, 21 जून 2016

दादा, आप्पा, तात्या, बाबा, बाप, वडिल, फादर, डॅड किंवा अन्य कोणत्या तरी एका नावाने वडील कायम आपल्या हृदयात असतात. भलेही ते या दिसणाऱ्या जगात असोत अथवा नसोत. ते कायम आपल्या जवळच असतात. वडील म्हटले की बागेत नेणारे, फिरायला नेणारे, गावाला नेणारे, शाळेत नेणारे, काही चुकलं तर मार देणारे, रागावणारे, पॉकेटमनी देणारे अशा हजारो आठवणी समोर दिसू लागतात. याच वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे 19 जून अर्थात "फादर्स डे‘. खरं तर वडिलांबद्दलची कृतज्ञता एका दिवसात व्यक्त करताच येणारी नाही.

दादा, आप्पा, तात्या, बाबा, बाप, वडिल, फादर, डॅड किंवा अन्य कोणत्या तरी एका नावाने वडील कायम आपल्या हृदयात असतात. भलेही ते या दिसणाऱ्या जगात असोत अथवा नसोत. ते कायम आपल्या जवळच असतात. वडील म्हटले की बागेत नेणारे, फिरायला नेणारे, गावाला नेणारे, शाळेत नेणारे, काही चुकलं तर मार देणारे, रागावणारे, पॉकेटमनी देणारे अशा हजारो आठवणी समोर दिसू लागतात. याच वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे 19 जून अर्थात "फादर्स डे‘. खरं तर वडिलांबद्दलची कृतज्ञता एका दिवसात व्यक्त करताच येणारी नाही. मात्र, धकाधकीच्या जीवनात किमान एक दिवस तरी वेळ काढून वडिलांशी गप्पा मारण्याचं हे छान निमित्त समजायला हरकत नाही. त्यामुळेच तर वडिलांबद्दलच्या भावना व्यक्त करण्याची संधी ‘ई-सकाळ‘ने ‘फादर्स डे‘च्या निमित्ताने तुम्हाला दिली. या आवाहनाला ‘ई-सकाळ‘च्या वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यापैकी कविता आणि लेख टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध करत आहोत. 

---------------------------------------------------------- 

सोडून गेलात आम्हाला तेव्हा…

आयुष्यातली  दिवाळीच संपून गेली …

 

बाबा गेला म्हणून काय झालं

मी आहेना पाठीशी ची बाराखडी

पाठी वळताच विरून गेली

 

आपण पोरके झालो म्हणजे नक्की काय

हेच कळत नव्हतं..

पण दुसरया घरी नांदायला आल्यावर

पोरकेपणाचं गणित उलगडलं..

 

मन तर तेव्हाच मेलं..

जेव्हा तुमच्या  पाठोपाठ

धाकट्याने पण जग सोडलं..

जगण्याच्या  नीर गाठीत  आम्हाला तेवढं अडकवलं..

 

बाबा होऊन आई मात्र तेव्हापासून  उभीच आहे

डोळ्यातले पाणी

आणि घशातले आवंढे गिळून

संसाराचा गाडा (?) लेकी - नातवांसाठी ओढती आहे

 

मोठी नंतर मी ही संसारात गुंतले

पण बापाशिवाय माहेरपणही पोरकं

हे आई झाल्यावर उमगले..

 

सगळंच तुटलय आता..

जोड काही लागत नाही

आतल्या आत काहीतरी खुपत राहतं

काय ते कळत नाही …

 

परत या म्हणू शकत नाही

वाट हि बघत नाही

पण आजकाल तुमची खूप आठवण येते

काय करू कळत नाही…

काही सुखद

‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्‌स’मध्ये होणार नोंद नागपूर - नागपुरातील गणेश डुमरे यांनी मंगळवारी उलटी अक्षरे रेखाटण्याचा अनोखा...

बुधवार, 28 जून 2017

अणदूर येथील रिक्षाचालक सोमनाथ बेंद्रेची समाजसेवा अणदूर - अणदूर परिसरातील अनेक वृद्ध, अंध-अपंग, अपत्यहीन व निराधारांसाठी सोमनाथ...

मंगळवार, 27 जून 2017

ई-मेल, फेसबुकद्वारे ऑर्डर मिळविण्यावर भर आजोबा, वडिलांचा पारंपरिक धान्य विक्रीचा व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत ई-मेल, फेसबुकवर...

मंगळवार, 27 जून 2017