रंगीबेरंगी शाळांमुळे पेंटर्सना चांगले दिवस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

गणोरे - कळवण तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या डिजिटल व ई-लर्निंग शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने तालुक्‍यातील पेंटर्सना चांगले दिवस येऊन रोजगार मिळत आहे.

पाचवीपासूनच चित्रकलेची आवड असणाऱ्या गिरिधर बाबूराव पवार (मोहबारी) या ए.टी.डी., जी.डी. आर्ट कलाशिक्षण झालेल्या युवकाने तालुक्‍यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कनाशी, शासकीय आश्रमशाळा, बापखेडा, डांगसौंदाणे, काठरे दिगर, दरेगाव, करंभेळ, तसेच चिंचपाडा, सिद्धेश्‍वर, जामले, वारे, लखाणी आदी गावांतही पेंटिंगची विविध कामे केली आहेत. साधारणत: आकारमानानुसार एका वर्ग खोलीसाठी 14 ते 20 हजार रुपये खर्च येतो.

रंगांचे वॉटर कलर व ऑइल कलर असे दोन प्रकार असतात. वॉटर कलर प्रतिलिटर 300 रुपये व ऑइल कलर प्रतिलिटर 400 रुपये भावाने खरेदी करावे लागतात. ब्रश, स्प्रे मशिन आदी साहित्य आवश्‍यक असते, तर या गिरिधर पवारने बऱ्याच ठिकाणी मोफतही पेंटिंगचे काम करून दिले आहे. उत्कृष्ट कलाशिक्षक भरत पवार व वामन बागूल, प्रफुल्ल सावंत आदी शिक्षकांनी पवार यांना वेळोवेळी प्रोत्साहन दिले.

माझ्या वडिलांना मूर्ती बनविण्याचे काम येते. त्यांनी तालुक्‍यातच नव्हे, तर बागलाण व सुरगाणा तालुक्‍यातील मंदिरांच्या सुरेख मूर्ती बनविल्या आहेत. मला ही कला आणखी वृद्धिंगत करावयाची आहे. शाळेचे काम घेताना व्यवहाराचा जास्त विचार करत नाही व रोजची मजुरी मिळाली तरी काम करतो. माझ्याकडे पाडगण, इन्शी अशा चार-पाच शाळांच्या कामांची मागणी आहे.
-गिरिधर पवार, पेंटर, मोहबारी

Web Title: Good day for painters