माणुसकीच्या भिंतीला मायेचा पाझर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

उस्मानाबाद - शहरातील समता मध्यवर्ती गणेश मंडळाने सुरू केलेल्या माणुसकीच्या भिंतीला मायेचा पाझर फुटू लागला आहे. शहरातील अनेक गरजूंना यातून मदत होत असल्याची भावना मंडळाने व्यक्त केली आहे. 

उस्मानाबाद - शहरातील समता मध्यवर्ती गणेश मंडळाने सुरू केलेल्या माणुसकीच्या भिंतीला मायेचा पाझर फुटू लागला आहे. शहरातील अनेक गरजूंना यातून मदत होत असल्याची भावना मंडळाने व्यक्त केली आहे. 

शहरातील समता मध्यवर्ती गणेश मंडळ व ढोल-ताशा पथकाकडून दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यंदाच्या वर्षी मंडळाने समता कॉलनीत स्तुत्य उपक्रम सुरू करून माणुसकीची भिंत उभी केली आहे. मंडळाच्या आवाहनाला प्रतिसाद देत परिसरातील अनेक दानशूर व्यक्ती कपडे घेऊन येत आहेत. खरे गरजू आहेत, त्यांच्यापर्यंत कपडे पोचविण्याची जबाबदारी मंडळाने घेतली आहे. मंडळाने सुरू केलेल्या या उपक्रमाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. मंडळाचे अध्यक्ष संदीप साळुंके, ऍड. अमर लाव्हरे, सुजित साळुंके, वैभव मोरे, निखिल शेरखाने, समर्थ हाजगुडे, प्रथमेश दडपे, अमित साळुंके, विनय जोशी, स्वप्नील नाईकवाडी, सूरज खोत, गणेश सावंत, संजय रणखांब आदी पुढाकार घेत आहेत. 

काही सुखद

एखादी कला, अावड जर व्यवसायात बदलता अाली तर स्वतःसह इतरांसाठीही रोजगार निर्मिती करण्यास मदतगार ठरते, हे अकोला शहरातील नारायणी पवार...

10.00 AM

कात्रज - दहीहंडीसाठी होणारा खर्च विधायक कार्याकडे वळविण्याच्या हेतूने कात्रज येथील शिवशंभू प्रतिष्ठानने वेल्हा तालुक्‍यातील...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

पिंपरी: सध्याच्या तरुणाईमध्ये अखंड ऊर्जा आहे. तरुणांनी एकत्र येऊन विधायक कामाचा वसा घेतला, तर ते नक्कीच सामाजिक कार्याचा मोठा...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017