घोगलीच्या शाळेसाठी ज्येष्ठ नागरिकाने दिली मदत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

नागपूर - जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासह त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या शिक्षिकांना मदतीचा हात म्हणून धमरपेठ येथील ज्येष्ठ नागरिक शंकरराव जाधव यांनी १० हजारांचा धनादेश दिला. ‘सकाळ’ने नुकतीच कॉन्व्हेंट लूकसाठी झटताहेत त्या दोघी ही बातमी प्रकाशित केली होती. 

कॉन्व्हेंटमुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत येणाऱ्या मुलांची संख्या खालावत आहे. ती पटसंख्या टिकवून ठेवण्यासाठी येथील शिक्षिकांनी कामगारांच्या १५ मुलांना या शाळेत प्रवेश देऊन स्वखर्चातून स्कूल व्हॅनची सोय केली. शैक्षणिक विकासासाठी त्यांची धडपड ‘सकाळ’ने उजेडात आणली. ‘सकाळ’चे वाचक शंकरराव जाधव यांनी बातमी वाचून शालेय खरेदीसाठी मदत करण्याचे आश्‍वासन दिले. या १० हजारांच्या मदतीचा धनादेश त्यांनी शिक्षिका पौर्णिमा पडधान यांना सुपूर्द केला. ८२ वर्षीय श्री. जाधव यांना समाजकार्याची आवड आहे. घरात ते एकटेच राहतात. ज्येष्ठ नागरिक मंडळाचे ते सदस्य असून, येरला धोटे हे गाव दत्तक घेतले आहे. तिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्यांच्यामार्फत सुटली. त्यांनी केलेल्या या १० हजारांच्या मदतीतून घोगली (ता. नागपूर) येथील विद्यार्थ्यांना बूट, मोजे, नोटबुक, लेखनसाहित्य, टीशर्ट खरेदी करण्यात येईल, अशी माहिती मुख्याध्यापिका प्रमिला डवरे यांनी दिली.

टॅग्स