पिकाचे पाणी तोडून पुरविले ग्रामस्थांना!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जुलै 2017

शिवसेनेचे विभागप्रमुख बिरदेव शेंडगे यांचा शेंडगे वस्ती ग्रामस्थांसाठी निर्णय

न्हावरे - न्हावरे (ता. शिरूर) जिल्हा परिषद गटाचे शिवसेनेचे प्रमुख बिरदेव शेंडगे यांनी आपल्या शेतातील पिकांचे पाणी बंद करून शेंडगे वस्तीतील ग्रामस्थांना पुरवीत आहेत. सामाजिक जाणिवेतून गेल्या दोन वर्षांपासून शेंडगे हा उपक्रम राबवीत आहे. त्याबद्दल त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.

सुमारे ७०० लोकसंख्या असलेल्या शेंडगे वस्तीतील ग्रामस्थांना न्हावरे गावाच्या पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा होत होता. मात्र, लोकसंख्येत वाढ झाल्यामुळे संबंधित गावठाणातील ग्रामस्थांनाच पाणी अपुरे पडू लागले. त्यातच पाइपलाइनही ठिकठिकाणी नादुरुस्त झाल्याने शेंडगे वस्तीला अनेक दिवसांपासून योजनेचे पाणी मिळत नाही, त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची विशेषतः महिलांची मोठ्या प्रमाणात ससेहोलपट होत होती. त्यातच विहिरी-विंधनविहिरी तळाला गेल्यामुळे शेंडगे वस्तीपुढे दोन वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचे संकट उभे राहिले होते, त्यामुळे नागरिकांची गरज ओळखून व मागणी लक्षात घेऊन सामाजिक जाणिवेतून बिरदेव शेंडगे यांनी आपल्या शेतातील उसाबरोबरच इतर पिकाचे पाणी बंद करून शेंडगे वस्तीतील ग्रामस्थांना पाणी देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी उपसरपंच सदस्य दादासाहेब बिडगर, माजी उपसरपंच संभाजी बिडगर, मारुती वाघमोडे, मंदा शेंडगे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाइपलाइनची दुरुस्ती केली. त्यानंतर मागील दोन वर्षांपासून शेंडगे यांनी दोन किलोमीटरवरील आपल्या कूपनलिकेतून दिवसातून दोन वेळेला ग्रामस्थांना पाणी देण्यास सुरवात केली आहे.

काही सुखद

औरंगाबाद - अभियंता दिनाच्या निमित्ताने कनिष्ठ अभियंता संघटना व पतसंस्थेतर्फे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाच कुटुंबीयांना...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

धुळे : येथील एका बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या तरुणाने दुचाकी (मोटार सायकल) दुरुस्तीच्या कामातून स्वत:सह इतर तीन तरुणांना...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

राजापूर - तालुक्‍यातील नाणार येथील जिल्हा परिषद शाळा नं. १ मध्ये गेल्या तीन वर्षापासून पित्रे फाऊंडेशन मुंबई, सिद्धी ट्रस्ट...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017