कशेडी घाटात अपघात; 10 जखमी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016

महाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात भोगाव येलंगेवाडी येथे गोव्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकने जीपला धडक दिली. यात 10 जण जखमी झाले.

पोलादपूर येथून गुरुवारी (ता. 24) सायंकाळी प्रवाशांना घेऊन जीप जात असताना हा अपघात झाला. ताबा सुटल्याने ट्रक कलंडून ट्रकचा चालकही जखमी झाला. अपघाताचे वृत्त कळताच नरेंद्र महाराज संस्थान नाणीजधामच्या रुग्णवाहिकेने सर्व जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.