वायंगणीत 209 कासवांच्या पिल्लांना समुद्रात सोडले 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

वेंगुर्ले - वायंगणी येथील किनाऱ्यावर आज ऑलिव्ह रिडलेच्या 209 पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले. या वेळी पोलिस अधीक्षक अमोघ गावकर उपस्थित होते. या मोहिमेस व्यापक रूप देण्याची गरज असल्याचे मत या वेळी उपस्थित पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले. 

समुद्रातील कासवजात नष्ट झाली तर समुद्रातील पाणी प्रदूषित होईल. समुद्रातील जलचरही नष्ट होतील. त्यामुळेच शासनाने कासव बचाव ही मोहीम राबविण्यास प्रारंभ केला असून त्यास वायंगणी गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे वायंगणी येथील कासवमित्र सुहास तोरसकर यांनी सांगितले. 

जागतिक वन दिनादिवशी आज वायंगणी समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाच्या 209 पिल्लांना जिल्हा पोलिस अधीक्षक गावकर व वनविभागाचे मठ येथील वनरक्षक व्ही. एस. नरळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नैसर्गिक अधिवासात समुद्रामध्ये सोडले. या वेळी मुख्याधिकारी रामदास कोकरे, पोलिस निरीक्षक कोळी, नेव्हीचे कर्नल अतुल धुरी, महाराष्ट्र हरितसेनेचे सदस्य संजय मालवणकर, ऍड. चैतन्य नाईक, कासवमित्र सुहास तोरसकर यांच्यासह राजन कोंडुरकर, सुनील राऊळ, बाळकृष्ण खोबरेकर, दिगंबर तोरसकर, गौरेश खडपकर, कुणाल खोबरेकर, प्रकाश खोबरेकर, सूरज तोरसकर उपस्थित होते. या वेळी राहुरी कृषी विद्यापीठाच्या शिर्डी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वायंगणी शाळा क्रमांक दोनच्या मुलांना ऑलिव्ह रिडले कासवाबद्दल माहिती दिली. 

समुद्रातील ऑलिव्ह रिडले कासवांची मांसाशिवाय कवचासाठीही शिकार केली जाते. साप, खेकडे, शार्क, घार, गरूड यांचाही धोका असतो; परंतु अतिलालसी प्रवृत्तीच्या माणसामुळे कासवांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. वायंगणी येथील कासवमित्र सुहास तोरसकर व त्यांचे मित्र कासवांनी वायंगणी किनाऱ्यावर घातलेल्या अंड्यांचे संरक्षण करत आहेत. आज एकूण 209 कासवांच्या पिल्लांना जन्म झालेल्या सर्वांना समुद्रामध्ये सोडण्यात आले. 

Web Title: 209 left the nesting of sea birds