रत्नागिरीतील २९२ गावे इको सेन्सिटिव्ह

रत्नागिरीतील २९२ गावे इको सेन्सिटिव्ह

रत्नागिरी - केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पश्‍चिम घाटाबाबत अधिसूचनेनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील इको सेन्सिटिव्हमधील २९२ गावांमध्ये वाळू उत्खनन, खाणकाम आणि प्रदूषणकारी उद्योगांना बंदी कायम राहिली आहे; मात्र घरांची दुरुस्ती आणि नूतनीकरणाला सूट दिली आहे. याशिवाय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या रेड झोन यादीत नसलेल्या उद्योगांचीही उभारणी या इको सेन्सिटिव्ह गावांत करता येणार आहे.

इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये असलेल्या ज्या गावांबाबत, ज्यांना आक्षेप असतील त्यांना ६० दिवसांत केंद्रीय वन व पर्यावरण विभागाकडे आक्षेप नोंदविता येणार आहेत. हे आक्षेप मान्य झाल्यास ६० दिवसांनंतर नवीन अधिसूचना जाहीर होणार आहे. अन्यथा २७ फेबुवारी २०१७ ला जाहीर झालेली अधिसूचना कायम होणार आहे.

पश्‍चिम घाटाच्या संवर्धनासाठी नेमलेल्या माधवराव गाडगीळ आणि कस्तुरीरंगन समितीचा अहवाल कोकणवासीयांनी नाकारला. त्यानंतर केंद्र शासनाने सर्व गावांनाच कुठल्या ठिकाणी इको सेन्सिटिव्ह झोन हवा आणि कुठे नको याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार महाराष्ट्रासह इतर चार राज्यांनीही याबाबतचे अहवाल केंद्र शासनाकडे पाठविले; मात्र या अहवालांचा केंद्रीय पातळीवर विचार झाला नाही. केंद्राच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने २७ फेब्रुवारी २०१७ ला केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाने पश्‍चिम घाट इको सेन्सिटिव्ह क्षेत्राची अंतिम अधिसूचना जाहीर केली आहे. यात पश्‍चिम घाटाचा ५६,८२५ चौरस किलोमीटरचा परिसर पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण २१४५ गावांचा समावेश आहे. त्यात सिंधुदुर्गमधील १९२, रत्नागिरी जिल्ह्यातील २९२, कोल्हापूरमधील १९२, नाशिकमधील १५२, पुणे जिल्ह्यातील ३३७, रायगडमधील ३५६, सांगली २४, सातारा ३००, ठाणे २६०, नंदुरबार २, धुळे ५, नगर ४२ आदी गावांचा यात समावेश आहे.

चिरे, वाळू उत्खननास पूर्णत: बंदी
केंद्राने नव्याने जारी केलेल्या इको सेन्सिटिव्ह झोन क्षेत्रामध्ये जुन्या घरांची दुरुस्ती आणि नूतनीकरण करता येणार असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. याखेरीज प्रदूषण नियंत्रण मंडळाने मान्यता दिलेले उद्योगदेखील या गावांमध्ये सुरू राहणार आहेत. सर्व प्रकारच्या खाणकामाला बंदी असल्याने इको सेन्सिटिव्ह झोनमधील १९२ गावांत चिरेखाण, माती उत्खनन, वाळू उत्खनन ठप्प राहणार आहे. तसेच क्रशर व इतर प्रदूषणकारी उद्योगदेखील पुढील अधिसूचनेपर्यंत बंद राहणार आहेत. औष्णिक विद्युत प्रकल्पांनाही या क्षेत्रात बंदी असणार आहे. विद्युत व इतर प्रकल्पांना प्रदूषणाचे नियम काटेकोरपणे पाळावे लागणार आहेत.

तालुकानिहाय गावे

*चिपळूण तालुका : रिक्‍टोली, तिवडी, बामणोली, पेढे परशुराम, कादवड, नांदिवसे, मोरवणे, स्वयंदेव, खोपड, गणेशपूर, कळकवणे, गाणे, ओवळी, पेढांबे, कोळकेवाडी, अडरे, कामथे खुर्द, टेरव बुद्रुक, मुंढे तर्फ चिपळूण, खरवते, ऐनारी, उभळे, शिरगाव, कुंभार्ली, कोंडमळा, कोंड फणसवणे, तळसर, पोफळी, कुडप, पोफळी बुद्रुक, डेरवण, तुरंबव, मुंडे तर्फ सावर्डा, ढाकमोळी, फुरूस, दुर्गवाडी खुर्द, मंजुत्री, तळवडे, पेढे, माजरे-गोवळ, कुटरे.

*खेड तालुका : तुळशी बुद्रुक आणि खुर्द, वडगाव बुद्रुक, शिवतर, कळंबणी खुर्द, पाखरवाडी, दहिवली, वाडी-बेलदार, दिवाणखवटी, वडगाव खुर्द, किंजळे तर्फ नातू, बिरमणी, कोंडवाडी, घेरापालगड, शिंगरी, पुरे खुर्द, जामगे, घेरा सुमारगड, खांदोटी, विहाली, किंजळे तर्फ खेड, नांदिवली, कळंबणी बुद्रुक, कसबा नातू, वाडी मालदे, पोयनार खुर्द, साखरोली खुर्द, तिसे खुर्द, अस्तान, घेरा रसाळगड, चाटव, प्रभूवाडी, देवघर, हुंबरी, खालची हुंबरी, सनाघर, कर्टेल, चिंचवली, वरवली, आंबवली, नवानगर, कुंभाड, नांदगाव, सांगलोट, शिरगाव, खोपी, निव्हे, बजरंगनगर, मोरवंडे खुर्द, चोरवणे, शिरगाव खुर्द, मिर्ले, शिव खुर्द, तळवट खेड, सापिर्ली, तळवट जावळी, चोरवणे उतेकरवाडी, तळवटपाल, कावळे, कसई, अस्ती मोहल्ला, साखर, भेलसाई बुढावाडी, धामणंद, भेलसाई चौथाई, वावे चिंचवटी, धामणंद गोंथल, केळणे, जावळी गावठाण, झगडेवाडी, कुंभवली, कुरावळ गावठाण, अंबादास.

*लांजा तालुका : वेसुर्ले, शिरंबावली, खोचरी, डाफळे, सालपे, कुरचुंब, माचाळ, चाफेट, कणगवली, वेरळ, चिंचुर्टी, खोरनिनको, पालू, हसोळ, आगरगाव, कुंभारगाव, प्रभानवल्ली, गुरववाडी, खानवली, वाघ्रट, कोट, कातळगाव, भटवाडीतर्फ वेरवली बुद्रुक, माजळ, रामगाव, इसवली, जावडे, भांबेड, पुरगाव, कुडेवाडी, भडे, रावारी, हर्दखळे, बापेरे, निवोशी, कुरंग, वाकेड, कोंडगे, पनोरे, विलवडे, रुण, आरगाव, खोरगाव, बोरथडे, हर्चे, कोंडगाव, रिंगणे.

*राजापूर तालुका : झर्ये, वाटूळ, येरडव, कोंडदसूर, परुळे, चिखले, कोंडसर खुर्द, पांगरी खुर्द, तिवरे, धामणपे, हरळ, वरची गुरववाडी, कोतापूर, कोळवणखडी, सौंदळ, खिणगिणी, केळवडे, पाथर्डे, पाचल, आगरेवाडी, भराडे, करक, हर्डी, गोठणे दोनिवडे, ओशिवले, वाळवड, काजिर्डा, फुपेरे, राजापूर, कोळंब, पहिलीवाडी (ताम्हाणे), जांभवली, मिळंद, बागकाझी, हसोळ तर्फ सौंदळ, पांगरी बुद्रुक, सावडाव, हातदे, डोंगर, मोसम, महालुंगे, पन्हाळे तर्फ सौंदळ, शेजवली, वालये, प्रिंदावण, बांदिवडे, कुंभवडे, वालये.

* संगमेश्‍वर तालुका : कुंभारखाणी बुद्रुक, शिरंबे, रातांबी, राजवली, शिंदे आंबेरी, विकासनगर, आसवे, कासे, कुचांबे, कुटगिरी, पाचांबे, नांदगाव, आंबेड, मावळुंगे, तुरळ, शेनवडे, कोंडभैरव, मासारंग, कातुर्डीकोंड, निवळी, गोळवली, श्रीरंगपूर, टेंबवाडी, अणदेरी, शेंबवणे, कुंभारखाणी खुर्द, हेदली, धामणी, डिंगणी, नायरी, प्रिंदावणे, मांजरे, तिवरे घेराप्रचितगड, असुर्डे, मळदेवाडी, उमरे, संगमेश्‍वर, उपळे, कोंडआंबेड, किंजळे, वाशी तर्फ संगमेश्‍वर, देओळे घेराप्रचितगड, खुळे, कुरधुंडा, फणसवळे, सायले, काटवली, तामनाळे, कुंडी, निगुडवाडी, गोठणे, बेलारी बुदुक, बेलारीवाडी, कोंडओझरे, तळवडे तर्फ देवरूख, मठ धामापूर, चांदीवणे, बेलारी खुर्द, बामणोली, सोनारवाडी, मारळ, आग्रेवाडी, करंडेवाडी, हातीव, खडीकोळवण, आंगवली, कोंढ्रण, देवघर, बोंडये, ओझरे बुद्रुक, निवधे, चाफवली, निनावे, दख्खिन, मुर्शी, भडकंबा, भोवडे, किरबेट, देवडे, वाडी आदिष्टी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com