विमा कंपनीच्या चुकीमुळे ४४ अपघात प्रस्ताव रखडले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

सावंतवाडी - गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचे ४४ प्रस्ताव ‘नॅशनल इन्शुरन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’च्या नजरचुकीमुळे प्रस्तावित राहिले आहेत. त्याचा फटका संबंधित लाभार्थ्यांना होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. नामंजूर करण्यात आलेल्या अर्जांची पुन्हा फेरतपासणी करण्याच्या सूचना कृषी अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आलेल्या आहेत. यासाठी दोन दिवसांची डेडलाइन देण्यात आलेली आहे.

कोणत्याही गरीब शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना ‘गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजने’द्वारे लाभार्थी म्हणून कृषी कार्यालयाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात येतो. यासाठी तशी अर्जाची तरतूद माहिती व कागदपत्राद्वारे तालुका कृषी कार्यालयामार्फत सादर करण्यात येते. सादर करण्यात आलेल्या कागदपत्रात जमिनीबाबतची महत्त्वाची कागदपत्रे मुख्यत्वे करून आवश्‍यक समजली जातात. यासाठी कृषी कार्यालयामार्फत नॅशनल इन्शुरन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला जिल्हाभरातून ७३ प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यातून यंदाच्या वर्षी २९ प्रस्तावांना संबंधित कंपनीने हिरवा कंदील दाखविला; मात्र उर्वरित ४४ प्रस्तावात विविध त्रुटी काढून तब्बल ४४ प्रस्ताव नाकारले गेले आहेत. कृषी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार यात ७३ पैकी ५० प्रस्ताव मंजूर होण्यासारखे होते. 

लाभार्थ्यांनी दिलेली बरोबर माहिती भरली होती; मात्र विमा कंपनीने सातबाऱ्यावर नाव नसल्याचे कारण पुढे केले आहे. यासंबधी जिल्हा कृषी कार्यालयाचे तंत्र अधिकारी  अरुण नातू यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘भरलेली माहिती बरोबर होती. सातबाऱ्यावर इतर हक्क म्हणून कायम कुळाची नावे असतात. सातबाऱ्यावर फक्त भोगटदाराचे नाव बघितले; मात्र त्यातील अपघातग्रस्ताचे नावाची खातरजमा योग्य पद्धतीने केली नाही. तसेच अपघाताचे स्वरूपही वेगवेगळे होते, त्यामुळेच ही समस्या निर्माण झाली आहे. ५० पेक्षाही जास्त प्रस्ताव हे मंजूर होण्यासारखे आहेत, हे विमा कंपन्यांच्या आपण निदर्शनास आणून दिले आहेत. तसेच या प्रस्तावाबाबत योग्य असा सकारात्मक निर्णय घेतो, असे विमा कंपन्यांकडून कळविण्यात आले आहे. नॅशनल विमा कंपनीची सल्लागार कंपनी असलेली बजाज कॅपिटल या कंपनीने याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याचे सुचविले आहे.’’