‘सिंधुदुर्ग’वर ७ हजार प्लास्टिकच्या बाटल्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 एप्रिल 2017

मालवण - किल्ला रहिवासी संघातर्फे प्रत्येक महिन्याला करण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहिमेत सात हजार प्लास्टिक बाटल्या सापडल्या आहेत. महिन्याभरात साठलेला विविध प्रकारचा कचरा होडीच्या साहाय्याने बंदरजेटी येथे आणून भंगारात देण्यात आला. गेल्या दीड महिन्यात ३५ पिशव्या कचरा सापडला आहे. 

दरम्यान, किल्ला रहिवासी संघाचे मंगेश सावंत यांनी शासनाच्या उदासीन धोरणाबाबत नाराजी व्यक्त केली. किल्ले सिंधुदुर्गवर शासनाने स्वच्छतेला प्राधान्य देताना कायमस्वरूपी उपाययोजनेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. कोट्यवधी रुपयांचे महोत्सव साजऱ्या करणाऱ्या शासनाने किल्ल्याच्या मूलभूत सुविधांकडे लक्ष द्यावे, असेही सावंत यांनी सांगितले.  

किल्ल्यावर दरवर्षी सुमारे तीन लाखांहून अधिक पर्यटक भेट देतात. वाढती पर्यटक संख्या लक्षात घेता केंद्र सरकारच्या युएनडीपी प्रकल्पाअंतर्गत पर्यटकांना किल्ले दर्शनावेळी कापडी पिशवी देण्याचा उपक्रम सुरू आहे, असे असताना हजाराच्या घरात प्लास्टिक साहित्य स्वच्छता मोहिमेत मिळत असल्याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.