अणुस्कुरा घाटातील दरडी धोकादायक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

राजापूर - कोल्हापूर, सांगली आदी घाटमाथ्याला कोकण भाग जोडणाऱ्या राजापूर तालुक्‍यातील अणुस्कुरा घाटातील अनेक ठिकाणच्या दरडी कोसळण्याच्या स्थितीमध्ये आहेत. काही ठिकाणी संरक्षण भिंतीही ढासळल्या आहेत. त्यामुळे शॉर्टकट ठरणारा अणुस्कुरा घाट पावसाळ्यात धोकादायक ठरण्याची शक्‍यता आहे. पाचल परिसर सह्याद्रीच्या पायथ्याशी असून या माध्यमातून राजापूर तालुका घाटमाथ्याशी जोडला आहे. 

राजापूर - कोल्हापूर, सांगली आदी घाटमाथ्याला कोकण भाग जोडणाऱ्या राजापूर तालुक्‍यातील अणुस्कुरा घाटातील अनेक ठिकाणच्या दरडी कोसळण्याच्या स्थितीमध्ये आहेत. काही ठिकाणी संरक्षण भिंतीही ढासळल्या आहेत. त्यामुळे शॉर्टकट ठरणारा अणुस्कुरा घाट पावसाळ्यात धोकादायक ठरण्याची शक्‍यता आहे. पाचल परिसर सह्याद्रीच्या पायथ्याशी असून या माध्यमातून राजापूर तालुका घाटमाथ्याशी जोडला आहे. 

घाटमाथ्यावरील कोल्हापूर, सातारा, सांगली आदी भागामध्ये जा-ये करण्यासाठी अणुस्कुरा घाटातून रस्ता तयार केला आहे. याव्यतिरिक्त घाटमाथ्यावर जाण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पुढे गगनबावडा-कोल्हापूर आणि दुसरा लांजा-साखरपा मार्गे कोल्हापूर असे दोन पर्यायी मार्ग राजापूरवासीयांसाठी आहेत. मात्र, हे दोन्ही मार्ग आर्थिकदृष्ट्या खर्चिक आणि वेळेचाही अपव्यय करणारे आहेत.अन्य मार्गांच्या तुलेनत ‘शॉर्टकट मार्ग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजापूर ओणी-अणुस्कुरा मार्गाचा वाहनचालकांकडून उपयोग केला जातो. त्यामुळे या मार्गावर वाहनांची मोठी रहदारी असते. तालुक्‍यात भरणाऱ्या आठवडा बाजारातही घाटमाथ्यावरील 

व्यापारी अणुस्कुरामार्गे येतात. कोल्हापूरला घाऊक बाजारपेठेमध्ये माल खरेदी-विक्रीसाठी जाणारेही तालुक्‍यातील स्थानिक व्यापारी आणि लोक आहेत. गतवर्षी पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीमध्ये अचानक या घाटामध्ये मोठे दगड कोसळून रस्ता बंद झाला होता. दगड बाजूला करण्यासाठी बांधकाम विभागाला कसरत करावी लागली होती. त्यामुळे यंदा पावसाळ्यापूर्वी घाटाची डागडुजी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

संरक्षण भिंतीची अद्यापही प्रतीक्षा
घाटातील धोकादायक दरडींसह ढासळलेल्या संरक्षण भिंतीमुळे पावसाळ्यात आणखी धोका वाढण्याची शक्‍यता आहे. घाटातून रस्ता तयार करण्यासाठी कटिंग केलेल्या अनेक मातीच्या डोंगरांना संरक्षण भिंतीची अद्यापही प्रतीक्षा आहे. 

कोकण

पाली : मुसळधार पावसामुळे येथील अंबा नदी दुथडी भरुन वाहत अाहे. त्यामुळे मंगळवारी (ता.१९) मध्यरात्री नंतर वाकण-...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

रत्नागिरी -  कोणत्याही ऋतुत निसर्गरम्य कोकणात केलेली भटकंती नेहमीच लक्षात राहणारी आहे. गेले दोन दिवस पडणाऱ्या पावसाने...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

सावंतवाडी - आंबोली धबधब्यापासुन मिळणारे उत्पन्न पारपोली ग्रामपंचायतीला देण्यावर वनविभागाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017