एटीएम नंबर विचारून 25 हजाराला गंडा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

रत्नागिरी : एटीएम नंबर विचारून घेऊन बॅंक खात्यातील सुमारे 25 हजार एकाने लांबविले. याबाबत जयगड पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना मंगळवारी (ता. 19) दुपारी तीनच्या सुमारास घडली. 

जयगड येथील अनिलकुमार महादेव कुंभार (वय 55) यांना अज्ञाताने फोनवरून "मी बॅंक ऑफ इंडियातून मॅनेजर बोलतोय. आपले बॅंक खाते सुरू करण्यासाठी एटीएम नंबर सांगा‘, असे सांगितले. त्यानुसार कुंभार यांनी एटीएमचा नंबर दिला. काही क्षणातच अज्ञाताने त्यांच्या खात्यातील 25 हजार रुपये लांबवले. कुंभार बॅंकेत गेले असता त्यांना हे समजले. कुंभार यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. 