आंबोलीत घरावर पेट्रोलच्या बाटल्या फेकून हल्ला

अमोल टेंबकर
बुधवार, 24 मे 2017

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. दीपांजली मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संतोष गावडे, आनंद गावडे (रा. आंबोली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार विश्वास सावंत अधिक तपास करत आहेत.

आंबोली - सावंतवाडी तालुक्यातील आंबोली येथील एका घरावर मंगळवारी मध्यरात्री शेजाऱ्यांकडून पेट्रोलच्या बाटल्या फेकून हल्ला करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, आंबोली येथील मोरे कुटुंबाच्या घरावर मध्यरात्री पेट्रोलच्या बाटल्या फेकून हल्ला करण्यात आला. शेजाऱ्यांकडून हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. जमिनीच्या वादातून हा प्रकार घडला आहे. पेट्रोलच्या बाटल्या फेकल्याने घराच्या छप्पराला आग लागली. सहा तरूणांनी हल्ला केल्याचा मोरे कुटुंबियांचा दावा आहे. मध्यरात्री एकच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. दीपांजली मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संतोष गावडे, आनंद गावडे (रा. आंबोली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार विश्वास सावंत अधिक तपास करत आहेत.