भुईबावडा घाटात दरडी कोसळल्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जुलै 2016

वैभववाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार आजही कायम होती. सकाळी थोडी फार विश्रांती घेतलेल्या पावसाने दुपारनंतर पुन्हा जोर धरला. भुईबावडा घाटात आज पहाटे दोन ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. सायंकाळी उशिरापर्यंत दरडी हटविण्यात आलेल्या नव्हत्या. 

करुळ घाटात बुधवारी दगड-माती रस्त्यावर आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. तासभर एकेरी वाहतूक सुरू होती. आज पहाटे भुईबावडा घाटात गगनबावड्यापासून दोन किलोमीटर अंतरावर दोन ठिकाणी दरड कोसळली. या दरडींचा काही भाग रस्त्यावर आला होता. त्यामुळे गगनबावडा -खारेपाटण मार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. 

टॅग्स