पाच दिवसांनंतरही दोन्ही एसटी बसचा शोध लागेना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

खेड- मुंबई-गोवा महामार्गावरील महाडजवळील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याने झालेल्या दुर्घटनेनंतर वाहून गेलेल्या दोन्ही एसटी बसचा शोध अद्याप लागलेला नाही. शोधमोहिमेत आज पाचव्या दिवशी दोन मृतदेह सापडले आहेत, त्यामुळे सापडलेल्या मृतदेहांची संख्या 27 झाल्याची माहिती आपात्कालीन नियंत्रण कक्षातील खेडचे प्रांताधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी दिली. 

आज दिवसभरात महाड तालुक्‍यातील वहूर येथे अविनाश मालप आणि ओवळे येथे जयेश बाणे यांचे मृतदेह सापडले. पाचव्या दिवशीही एनडीआरएफचे जवान आणि स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळ ते दादली पूल या परिसरात शोधमोहीम सुरूच ठेवली. फार क्वचितच एखादे वाहन या नदीपात्रातील प्रवाहात काही किलोमीटरपर्यंत वाहून जाऊ शकते. या वाहनांवर नदीपात्रातील माती व दगड येऊन बसल्याची शक्‍यता असून, यामुळे या कॅमेऱ्यांचा उपयोग होत नसल्याचे अनुपम श्रीवास्तव यांनी सांगितले.
सावित्री नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मगरींचा वावर असून, त्यामुळेही अडथळे येत आहेत. दोन्ही बस मिळेपर्यंत शोधकार्य सुरूच राहील, अशी माहिती एनडीआरएफचे कमांडर अनुपम श्रीवास्तव यांनी दिली.