लांजा तालुक्यात गाडीतून फेकून देत भावाचा खून

लांजा तालुक्यात गाडीतून फेकून देत भावाचा खून

लांजा - दारूच्या नशेत सख्ख्या चुलत भावाला गाडीत मारहाण करून गाडीतून फेकून दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना  लांजा तालुक्‍यातील सापुचे तळे येथे शुक्रवारी (ता. १४) घडली. 

सापुचे तळे येथील तीन सख्खे चुलत भाऊ शुक्रवारी (ता. १४) दुपारी कामानिमित्त मोटार (एमएच ०८ आर ७१३२) घेऊन लांजा येथे आले होते. तेथे दोन भावांचा आपसात वाद झाला. त्यानंतर या तिघांनी मद्यप्राशन करून सोबत दारूच्या बाटल्या घेतल्या. गाडीत आणखी दारू पित असताना या तिघांतील मनोहर महादेव गोरे याने सोबत असलेल्या सख्खा चुलत भाऊ कौस्तुभ रामचंद्र गोरे याच्या अंगावर दारू ओतली. याचा राग आल्याने कौस्तुभ व मनोहर या दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली.

कौस्तुभने मनोहरचे डोके गाडीतील गॅंस सिलिंडरवर आपटले. त्यामुळे तो बेशुद्ध पडला. मनोहर बेशुद्ध पडल्याची कल्पना रोहनला दिल्यावर दोघांनी सुखादेवीजवळ मनोहरला गाडीतून बाहेर फेकले. त्याने स्वतः गाडीतून उडी मारल्याचे सांगत त्यांनी त्याला सापूचेतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. परंतु तत्पूर्वीच तो मृत झाला होता. तेथे डॉक्‍टर नसल्याने तेथील युवकांनी त्याला रत्नागिरी सरकारी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. 

रत्नागिरी पोलिसांनी एफआयआर दाखल केला. लांजा पोलिसांना कौस्तुभ व रोहन यांनी मनोहर याने नशेत गाडीतून उडी मारल्याचे सांगितले. पोलिसी खाक्‍या दाखवल्यानंतर त्यांनी गुन्हा कबूल केला. पोलिसांनी कौस्तुभ गोरे (वय २९), रोहन भागेश गोरे (वय २८) या दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलिस निरीक्षक विकास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पंडित पाटील हे  करीत आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इगळे यांनी घटनास्थळी भेट दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com