कोकणात उभारतोय पहिला सामूहिक गांडूळ खत प्रकल्प

अमित पंडित
गुरुवार, 11 मे 2017

सेंद्रिय शेती ही भविष्यातील गरज असल्याने हा प्रकल्प गटातील सदस्यांना लाभदायी ठरेल. प्रारंभी सदस्यांच्या काजू आणि आंबा लागवडीसाठी हे खत वापरण्यात येणार आहे. त्यानंतर त्याची विक्री करू.
- राजीव चव्हाण, सेंद्रिय गट अध्यक्ष

साखरपा - नजीकच्या पुर्ये तर्फे देवळे गावात तालुक्‍यातील पहिला सामूहिक गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प उभारला जात आहे. तालुका कृषी विभागाच्या आत्मा याजनेअंतर्गत सेंद्रिय गटातून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. शेतकरी एकत्र आले असून त्याची देखभाल एकत्रित होणार असल्यामुळे त्यावरील खर्च कमी होणार आहे.

पुर्येतर्फे देवळे येथील सेंद्रिय गटात एकूण 23 सदस्य आहेत. 42 चौरस फूट आकाराची एक याप्रमाणे शेड उभारणार आहे. यापैकी 17 सदस्यांच्या शेड एकाच ठिकाणी उभारल्या जात आहेत. कृषी सहायक सुनील जगदाळे यांच्या मार्गदर्शनाली शेड उभारली जात आहे. गटाचे सदस्य केशव शिवराम शिंदे यांनी आपली सुमारे 10 गुंठे जमीन ह्या शेडनिर्मितीसाठी वापरण्याची परवानगी दिली आहे. शेडची निर्मिती एकत्रितपणे केल्यामुळे खतनिर्मिती दरम्यानची पाहणी, शेडची देखभाल, पाणी मारणे ह्या सगळ्या गोष्टी सोप्या होणार असल्याचे जगदाळे यांनी सांगितले. शेडमधून वर्षातून सहा ते आठ वेळा खतनिर्मिती होऊ शकते. तसेच प्रत्येक वेळी प्रत्येक शेडमधून सरासरी सातशे ते आठशे किलो खतनिर्मिती होऊ शकते. सर्व शेडच्या बांधणीसाठी एक लाख 80 हजार खर्च आला. त्यापैकी गटासाठी आत्मा योजनेतून एक लाखांचे अनुदान मिळणार आहे. येत्या पावसाळ्यात हा प्रकल्प कार्यान्वित होईल.

कृषी सहायक सुनील जगदाळे यांनी या प्रकल्पाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ""सध्या वाढत चाललेल्या रासायनिक खताच्या वापराला गांडूळ खत हा मोठा आणि योग्य पर्याय आहे. गांडूळ शेतकऱ्यांचा मित्र आहे. त्यांच्या वापरातून शेतातील तसेच आवारातील पालापाचोळा, टाकावू अन्नपदार्थ, गवत, काडीकचरा यापासून उत्तम प्रतीचे गांडूळ खत निर्माण करता येऊ शकते. हे खत फळपीक आणि भाजीपाला लागवडीसाठी अत्यंत पोषक ठरते. खताच्या वापरामुळे फळपिकात वाढ होते आणि भाजीपाल्याची प्रत सुधारते.

गांडूळ खत हे केवळ पालापाचोळा आणि काडीकचरा यावर होते. यासाठी शेणाची फारशी गरज लागत नाही. त्यामुळे जनावरे नसलेल्या कोकणातील प्रत्येक शेतकऱ्याला आवारातील पालापाचोळ्यावर हे खत निर्माण करणे शक्‍य आहे.
- सुनील जगदाळे, कृषी सहायक

कोकण

रत्नागिरी -  कोणत्याही ऋतुत निसर्गरम्य कोकणात केलेली भटकंती नेहमीच लक्षात राहणारी आहे. गेले दोन दिवस पडणाऱ्या पावसाने...

03.12 AM

सावंतवाडी - आंबोली धबधब्यापासुन मिळणारे उत्पन्न पारपोली ग्रामपंचायतीला देण्यावर वनविभागाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे...

03.12 AM

सावंतवाडी -‘शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत करेपर्यंत दाढी काढणार नाही’, असा पण माजी खासदार...

02.12 AM