तेरा शिक्षकांची मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत

atharva
atharva

महाड : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये चांगले शिक्षण मिळत नसल्याची ओरड कायमच होत असते त्यातच या शाळेत शिकवणारे शिक्षक आपली मुले मात्र अन्य शाळात घालत असतात असे चित्र बहुसंख्य ठिकाणी दिसत असते.परंतु अशा प्रश्नांना सडेतोड उत्तर देत महाड तालुक्यातील तब्बल तेरा शिक्षकांनी आपल्या मुलांना गावातच जिल्हा परिषदेच्या शाळात घालण्याचे धाडस दाखवले आहे.केवळ मुलांना शाळेत दाखल करण्यापुरते हे शिक्षक थांबले नाहित तर आपल्या मुलांसह शाळांतील इतर मुलांची गुणवत्ताही सुधारली आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता सुधारावी,पालकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल करावे.यासाठी जाहिरात फलके,पालकांना पत्रव्यवहार व अनेक योजना राबवल्या जात आसतात परंतु पालकांचा ओढा इंग्रजी माध्याम व खाजगी शाळांकडे असतो त्यातच शिक्षक आपली मुले खाजगी शाळेत घालतात आणि आम्हाला उफदेश करतात अशी पालकांची धारणा झाली आहे.यासाठी तालुक्यातील काही मराठी व ऊर्दू शाळेच्या शिक्षकांनी आपली मुले गावातील शाळेत दाखल केली आहेत. गुरुजींची मुले येथे शिकतात यामुळे पालकांचा विश्वास वाढला असुन शाळांतील पटलंख्याही वाढली आहे.अनेक शाळांतील मुले शिष्यवृत्ती व इतर स्पर्धात्मक परिक्षांमध्ये चमकली आहेत.शिक्षकांचे हे प्रमाण सद्या जरी कमी असले तरी काही चांगले शिक्षक हे आव्हान स्विकारुन आपल्या पाल्यासह शाळेत मुलांचे भवितव्यही उज्ज्वल करत आहेत.

शिक्षक
संभाजी खोत (रिंगीचा कोंड) सतीशकुमार मुंडे (विन्हेरे) बळीराम वरंडे, सरोज धोदाडे, प्राची यलमार, दिनेश शेडगे, देवीदास जाधव, भागीनाथ नागरगोळे, अतहर पिरजादे, मनसुरा अहमद, मोहमद अन्सारी, अफरिन पटेल व आयेशा देशमुख

अथर्व खोत राज्यात चमकला
रिंगीचा कोंड या दुर्गम शाळेत येथील शिक्षक संभाजी खोत यांनी आपल्या दोन्ही मुलांना दाखल केली आहे.शहराच्या ठिकाणी चांगली सुविधा असतानाही त्यांनी हे धाडस केले.शाळेत दर्जेदार शिक्षण सर्व मुलांना दिले.त्यांचा मुलगा अथर्व हा याच शाळेतुन पाचवीच्या शिष्यवृत्ती परिक्षेत रायगड जिल्ह्यात प्रथम आला आहे तर राज्यात पहिल्या दहामध्ये चमकला आहे,या शाळेत शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल सलग पाच वर्षे शंभर टक्के लागला आहे.नवोदय विद्यालयाच्या गुणवत्ता परिक्षेची तयारी या शाळेत घेतली जाते.

आपल्या मुलांना गावातील मुलांसह शाळेत शिकवले तर पालकांचे व मुलांचे मनोबल उंचावते.प्रत्येक शिक्षकांने आपल्या पाल्याला जिल्हापरिषद शाळेत दाखल करुन समाजाच्या शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे.
- संभाजी खोत (शिक्षक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com