कृषिकन्यांनी बनवले उर्फीच्या विकासाचे रोल मॉडेल!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

दहा वर्षांचे व्हिजन - प्रतिकृतीचे ग्रामस्थांकडूनही कौतुक, विविध विषयांची मांडणी

चिपळूण - कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषिकन्यांनी एकात्मिक शेतीतून उर्फी (ता. दापोली) गावाच्या ग्रामविकासाचे रोल मॉडेल तयार केले आहे. कृषी क्षेत्राच्या माध्यमातून पुढील दहा वर्षांत होणाऱ्या गावच्या प्रगतीच्या अनुषंगाने या संकल्पचित्रात विविध विषयांची मांडणी करण्यात आली.

सहजपणे लक्षात येण्यासाठी कल्पकतेने कृषिकन्यांनी तयार केलेली प्रतिकृती कृषी विद्यापीठातील अधिकाऱ्यांसह उर्फी ग्रामस्थांसाठी लक्षवेधी ठरली आहे. 

उर्फी हा दापोली तालुक्‍यातील शेवटचे गाव. विविध प्रांतातून कोकण कृषी विद्यापीठात शिकण्यासाठी आलेल्या कश्‍मिरा सुर्वे, उमा प्रभुदेसाई, कंचन कुल्हारी, स्मृती सुर्वे, स्वरूपा खेडेकर, शुभलक्ष्मी, प्रणाली सावंत, नेहा चोडणकर, मनु पेडणेकर, आशा कुमारी, स्वप्नाली धामापूरकर, दीप्ती दिसले, शीतल गोरीवले यांनी कार्यानुभवासाठी या गावाची निवड केली.

गावाची माहिती गोळा करत असतानाच परसबाग तयार करणे, एक काडी भात लागवड यासारखी प्रगत शेती आणि तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना दिली. निसर्गाच्या साथीने शेतीच्या माध्यमातून पुढील दहा वर्षांत गावचा विकास कसा शक्‍य आहे, हे या कृषिकन्यांनी संकल्पचित्राच्या माध्यमातून पटवून दिले. 

सुजीतकुमार कदम, प्रसाद मांडवकर, मिलिंद बालगुडे, अश्‍विनी म्हसकर, श्रद्धा रेडीज यांच्या कृषिकन्यांनी गावातील ग्रामस्थांची गरज भागविणारा, त्यांच्या समस्या सोडविणारा व त्यांच्या ज्ञानामध्ये भर टाकणारा प्रकल्प साकारला आहे. या रोल मॉडेलच्या माहितीचा उपयोग करून उर्फी गावचा विकास शक्‍य आहे. निसर्गाच्या साधन संपत्तीचा जपून वापर केला पाहिजे. शेती व जोडधंद्याच्या माध्यमातून गावची प्रगती शक्‍य आहे, असा संदेश या प्रकल्पातून देण्यात आला आहे. 
- डॉ. उत्तम महाडकर, सहयोगी अधिष्ठाता, दापोली कृषी विद्यापीठ