काँग्रेस, राष्ट्रवादीकडून मोर्चेबांधणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

दापोली - जिल्हा परिषदेचा पालगड गट तालुक्‍यात महत्त्वाचा आहे. तालुक्‍यात राजकीय वर्चस्व असलेले काँग्रसचे माजी राज्यमंत्री बाबूराव बेलोसे यांचे गाव या गटात आहे. मात्र, गेली काही वर्षे या गटात शिवसेनेचे वर्चस्व आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून शिवसेनेचे राजेंद्र फणसे यांनी विजय मिळवला होता. पालगड गटात मराठा समाजाची निर्णायक मते आहेत. या वेळी येथील आरक्षणात बदल झाला असून, पालगड गट नागरिकांचा मागास स्त्री प्रवर्गासाठी राखीव झाला आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेला पालगड गट जिंकण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. सेना आणि राष्ट्रवादीतील नाराजांचा फायदा कोणाला होतो यावर येथील विजयाची गणिते अवलंबून आहेत. येथील विद्यमान सदस्याचा पत्ता कट झाला आहे. आरक्षण बदलल्याने या गटात सेनेकडून श्रावणी गोलामडे यांचे नाव चर्चेत आहे. या गटातून काँग्रेस व राष्ट्रवादीकडून कोणाला संधी दिली जाते हे महत्त्वाचे ठरणार आहे. स्त्री मतदारांची संख्या जास्त असल्याने ही मते निर्णायक ठरणार आहेत.

गेल्या निवडणुकीत पालगड गणातून सेनेच्या संजना गुजर यांनी तिरंगी लढतीत काँग्रेसच्या नेहा जाधव यांच्यावर मोठ्या फरकाने विजय मिळविला होता. पालगड गण यावेळी सर्वसाधारण गटासाठी खुला आहे. काँग्रेसकडून या गणात सूर्यकांत यादव यांच्या नावाची चर्चा असली, तरी काँग्रेसचे युवा नेते ॲड. सुशांत बेलोसे हेही या गटातून इच्छुक आहेत. सेनेकडून सुनील जाधव आणि विद्यमान जि.प. सदस्य राजेंद्र फणसे इच्छुक होते.

राष्ट्रवादीकडून कोणाला संधी दिली जाते, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. आरपीआयकडून अनिल जाधव यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.

खेर्डी गण नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रीसाठी राखीव आहे. मागील वेळी असलेला साकुर्डे गण यावेळी रद्द झाला आहे. साकुर्डे मतदारसंघातून उन्मेष राजे निवडून आले होते. त्यावेळी राजेश निर्मळ व उन्मेष राजे यांच्यात सामना रंगला होता.

पालगड जिल्हा परिषद गट
एकूण मतदार : २०,७८७ 
स्त्री मतदार : १०,७८९ 
पुरुष मतदार : ९९९८  या गटातून 
विद्यमान सदस्य : राजेंद्र फणसे-पवार (शिवसेना)

समाविष्ट गावे :
पालगड, शिरखल, मुगीज, सोवेली, शिरसाडी, सातेरे तर्फे नातू, जामगे, विसापूर, आवाशी, शिरसोली, टांगर, खेर्डी, मौजे दापोली, करंजाणी, महाळुंगे, पाचवली, माटवण, नवानगर, वडवली, हातिप, सोंडेघर, वनौशी तर्फे नातू, पिसई, कुडावळे, बोंडिवली

Web Title: congress ncp planning for zilla parishad election