वेंगुर्लेत ३१ला खेकडा महोत्सव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

वेंगुर्ले  - येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रामधील आदर्श कृषी पर्यटन केंद्रातर्फे ३१ डिसेंबरला खेकडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सायंकाळी ५ पासून रात्री १० पर्यंत खेकडा महोत्सव चालणार आहे. यामध्ये खेकड्यापासून बनविलेल्या विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद खवय्यांना घेता येणार आहे. महिलांसाठी खेकडा मसाला ही पाककला स्पर्धा आयोजित केली आहे. महिलांनी २५ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता खेकडा मसाला बनवून आदर्श कृषी पर्यटन केंद्राकडे आणावयाचा आहे. प्रथम तीन क्रमांकांना २००१, १५०१, तसेच १००१ रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.

वेंगुर्ले  - येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रामधील आदर्श कृषी पर्यटन केंद्रातर्फे ३१ डिसेंबरला खेकडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सायंकाळी ५ पासून रात्री १० पर्यंत खेकडा महोत्सव चालणार आहे. यामध्ये खेकड्यापासून बनविलेल्या विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद खवय्यांना घेता येणार आहे. महिलांसाठी खेकडा मसाला ही पाककला स्पर्धा आयोजित केली आहे. महिलांनी २५ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता खेकडा मसाला बनवून आदर्श कृषी पर्यटन केंद्राकडे आणावयाचा आहे. प्रथम तीन क्रमांकांना २००१, १५०१, तसेच १००१ रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिला स्पर्धकांना आदर्श कृषी पर्यटन केंद्रामध्ये दोन दिवस राहण्याचे पॅकेज असलेले बक्षीस असेल. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली नावनोंदणी २४ ला सायंकाळी ६ वाजेपर्यंत केंद्राकडे करावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. महोत्सवात स्टॉल मांडू इच्छिणाऱ्यांनीही संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, कोकण ग्रीन लाइफ व आयडियल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या आदर्श कृषी पर्यटन केंद्रामध्ये ३० व ३१ ला खेकडा संवर्धन या विषयावर मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्यक्ष खेकडा पालन तलावावर कांदळवनातील खेकडा शेती, तलावातील खेकडा शेती, इन हाऊस खेकडा शेती, सॉफ्ट शेल खेकडा शेती यांबाबत तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन दिले जाणार आहे. 

मार्गदर्शन वर्गासाठी मर्यादित प्रवेश दिला जाणार असून नावनोंदणी फळसंशोधन केंद्राकडे करावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स

कोकण

सावंतवाडी : होडावडा येथील निसर्गमित्र मंगेश माणगावकर यांच्या बागेत बेडूक,...

11.24 AM

प्रमुख सहकाऱ्यांशी चर्चा; आज दिल्लीवारी शक्‍य कणकवली / सावंतवाडी -...

07.24 AM

हेलियम वायूचा इथेच लागला शोध : पर्यटकांबरोबरच अभ्यासकांनाही किल्ला घालतोय साद...

05.51 AM