मुलीवर अत्याचाराची पतीविरुद्ध तक्रार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

सावंतवाडी - अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी संशयित चंदन आडेलकर याला सोमवारी अटक करण्यात आली आहे. या प्रकाराला चंदन याच्या पत्नीनेच पोलिसांत तक्रार देऊन वाचा फोडली.

सावंतवाडी - अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी संशयित चंदन आडेलकर याला सोमवारी अटक करण्यात आली आहे. या प्रकाराला चंदन याच्या पत्नीनेच पोलिसांत तक्रार देऊन वाचा फोडली.

माजगावमधील चंदन आडेलकर याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. याची माहिती त्याच्या पत्नीला समजताच तिने या प्रकरणी पतीविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अल्पवयीन मुलीच्या घरची परिस्थिती गरिबीची आहे. महिन्यातून काही वेळा ती राहण्यासाठी माजगावातील नातेवाइकांकडे येई. याचा फायदा उठवून चंदनने दारूच्या नशेत तिच्यावर अत्याचार केले. येथील पोलिस ठाण्यात महिला दक्षता समितीसमोर संबंधित अल्पवयीन मुलीचा जबाब घेण्यात आला. या प्रकरणी आडेलकर याला येथील पोलिसांनी अटक करून गुन्हा नोंदविला आहे. आडेलकर एका गॅरेजमध्ये कामाला आहे.

Web Title: crime in sawantwadi