एक दिवस शाळेसाठी' बाबत 5 ला सभा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जुलै 2016

सिंधुदुर्गनगरी- विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या जिल्हाधिकारी, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समन्वय समितीच्या बैठकीत सर्व अधिकाऱ्यांमार्फत एकमताने कोकण विभागामध्ये एक दिवस शाळेसाठी हा उपक्रम राबविण्याचे निश्‍चित करण्यात आले.

सिंधुदुर्गनगरी- विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या जिल्हाधिकारी, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समन्वय समितीच्या बैठकीत सर्व अधिकाऱ्यांमार्फत एकमताने कोकण विभागामध्ये एक दिवस शाळेसाठी हा उपक्रम राबविण्याचे निश्‍चित करण्यात आले. या उपक्रमातून जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारावी, शासकीय अधिकाऱ्यांच्या योग्य मार्गदर्शनाचा, तसेच मदतीचा फायदा शाळेला व्हावा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, एकूणच शासकीय अधिकाऱ्यांमध्ये शिक्षणाप्रती आणि विद्यार्थ्यांप्रती आस्था निर्माण व्हावी आदी उद्देशून या कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी स्वेच्छेने आपले योगदान देऊन कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे. 

कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणेतील वर्ग 1 व वर्ग 2 चे अधिकारी, विस्तार अधिकारी संवर्गातील वर्ग 3 चे सर्व अधिकारी आणि आयसीडीएस विभागातील सर्व मुख्य सेविकांनी सकारात्मक दृष्टीने चर्चा करण्यासाठी 5 जुलैला नवीन डीपीडीसी हॉलमध्ये सायंकाळी 5 वाजता बैठकीस सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले.