गोवळकोटच्या तोफांना विलंब

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

चिपळूण - गोवळकोट येथील तोफा गोविंदगडावर हलविण्यासाठी तहसीलदारांनी पुढाकार घेत वादग्रस्त विषयावर तोडगा काढला होता. गोवळकोट येथील तोफा काढण्याचे निश्‍चित झाले असले, तरी त्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्यासाठी बुधवारी (ता. २४) बैठक घेण्यात येणार आहे. 

शहरातील गोवळकोट धक्‍क्‍यावर सहाहून अधिक तोफा गाडलेल्या अवस्थेत आहेत. या तोफांचा उपयोग गोवळकोट धक्‍क्‍यावर होड्या बांधण्यासाठी केला जातो. या तोफा जमिनतीतून उकरून काढून गोविंदगडावर नेण्याचा निर्णय झाल्यावर काहीजणांनी विरोध केला होता. 

तहसीलदार देसाई यांनी नागरिकांची बैठक घेतली. बैठकीत सर्वांनी आपले मुद्दे मांडले. त्यानंतर ऐतिहासिक सहा तोफा गोविंदगडावर नेण्याचा निर्णयही झाला; मात्र गडावर या तोफा सुरक्षित राहतील का, त्यांची देखभाल व देखरेख कोण करणार, भविष्यात एखादी तोफ भंगली, चोरीला गेली तर त्याबाबत शासनाची भूमिका काय असेल अशा अनेक प्रश्नांची चर्चा सुरू झाली. त्यातून तोफांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या सर्व तोफा गोविंदगडावर नेण्याची मागणी काही सामाजिक संस्थाकडून केली जात आहे. त्यातील तीन तोफा गोवळकोट धक्‍क्‍यावर आणि तीन तोफा गोविंदगड किल्ल्यावर ठेवण्यात याव्यात अशी मागणीही होऊ लागली आहे. त्यामुळे निर्णयाची अंमलबजावणी थांबली आहे. त्यामुळे पुन्हा बुधवारी तहसीलदारांनी बैठक बोलावली आहे.