पर्यटकांना खुणावताहेत पावसाळी पर्यटनस्थळे...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

संगमेश्‍वर तालुका - मार्लेश्‍वर ते सप्तेश्‍वर... भक्‍ती आणि निसर्गाचा आनंद...
देवरूख - निसर्गाचे अलौकिक सौंदर्य लाभलेल्या संगमेश्‍वर तालुक्‍यात पावसाळी पर्यटनस्थळे पर्यटकांना खुणावू लागली आहेत. उन्हाळी हंगाम संपून पावसाने जोर केला. त्यामुळे आगामी काळात पर्यटकांची पावलेही तालुक्‍यातील काही ठिकाणी वळू लागली आहेत. हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात कोसळणाऱ्या धबधब्यांच्या साक्षीने पर्यटक मार्लेश्‍वरसारख्या ठिकाणी भक्तिमार्गाचाही आनंद लुटतात.

देवरूखपासून अवघ्या १७ किमी अंतरावर असणाऱ्या मार्लेश्‍वरची कीर्ती संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आहे. सह्याद्रीच्या कुशीत एका गुहेत वसलेले हे देवस्थान आणि त्याच्या समोरच असलेला बारमाही वाहणारा धारेश्‍वर सर्वांना आकर्षित करतो. संगमेश्‍वरपासून अवघ्या दोन किमी अंतरावरील कसबा गावात कर्णेश्‍वराचे मंदिर वसले आहे. पावसाळ्यातील पर्यटनासाठी आलेले पर्यटक या मंदिराला आवर्जून भेट देतो. या मंदिराच्या बाजूलाच सूर्यनारायणाचे मंदिर आहे. अलकनंदा आणि वरुणा नदीच्या संगमावर वसलेले संगमेश्‍वराचे मंदिरही ऐन पावसात पाहणे मजेचेच.

मुंबई-गोवा महामार्गापासून जवळच असलेले संगमेश्‍वरातील सप्तेश्‍वर मंदिर हे देखील पर्यटकांचे आकर्षण आहे. मंदिरासमोरील बारमाही पाणी व निसर्गसंपन्न आवार यामुळे पावसाळी सहली येथे येतेत. मंदिरासमोरीस प्राचीन इमारतीत बारमाही पाण्याचा स्रोत असून येथे शंकराच्या पिंडी आहेत. सह्याद्रीच्या दोन टोकांना वसलेले किल्ले प्रचीतगड आणि देवरूखजवळचा महिमानगड हे पावसातील साहसी पर्यटकांना खुणावत आहेत.