सावंतांच्या कारखान्याला जिल्हा बॅंकेने साहाय्य करावे - नीतेश राणे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

कणकवली - वित्तीय साहाय्य होत नसल्याने कारखाना रखडला असल्याचा आरोप माजी आमदार विजय सावंत करीत आहेत. त्यांच्या कारखान्यासाठी जिल्हा बॅंकेने आर्थिक सहकार्य करावे, अशी विनंती आमदार नीतेश राणे यांनी जिल्हा बॅंकेकडे लेखी निवेदनातून केली आहे.

श्री. राणे यांनी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले की, विजय सावंत यांच्या कारखान्यामुळे किमान दहा हजार बेरोजगारांना रोजगार मिळेल, तसेच शेतकऱ्यांचेही भले होणार आहे. त्यामुळे कारखान्याला अर्थसाहाय्य करण्यासाठी जिल्हा बॅंकेने पुढाकार घ्यावा आणि नियमानुसार कारखाना उभारणीसाठी सहकार्य करावे.

शिडवणे येथील नियोजित साखर कारखाना उभारणीमध्ये वित्तीय संस्था पतपुरवठा करीत नाहीत. तसेच राणे व्हेंचर्सतर्फे अडथळे आणले जात असल्याचा आरोप विजय सावंत करीत आहेत. मात्र, त्यांच्या कारखान्याला राणे व्हेंचर्सचा अडथळा येणार नाही, हे आम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहीर केले आहे. त्यामुळे आता जिल्हा बॅंकेने पुढाकार घेऊन सावंत यांच्या कारखान्याला सहकार्य करावे, असे श्री. राणे यांनी पत्रकात म्हटले आहे.