दोडामार्गात कॉंग्रेसची सरशी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

दोडामार्ग - कसई दोडामार्ग नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक सातमधील पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्या अदिती अजय मणेरीकर विजयी झाल्या.

त्यांनी शिवसेनेच्या फुलराणी ज्ञानेश्‍वर गावकर यांचा 74 मतांनी पराभव करत शिवसेनेचा धुव्वा उडवला. कॉंग्रेसने या वेळी विजय मिळवून मागील पराभवाचे उट्टे काढले. मणेरीकर यांना 112, तर गावकर यांना 38 मते मिळाली.

कसई दोडामार्ग नगरपंचायतीत कॉंग्रेस चार, राष्ट्रवादी दोन, मनसे एक, शिवसेना पाच, भाजप पाच असे बलाबल होते. पोटनिवडणुकीआधी युतीची सदस्य संख्या नऊ होती, तर आघाडीची सदस्य संख्या मनसेसह आठ होती. आता पोटनिवडणुकीत कॉंग्रेस जिंकली असली, तरी युती किंवा आघाडीच्या पक्षीय बलाबलात काहीच फरक पडलेला नाही. युती नऊवर, तर आघाडी आठवरच राहिली आहे.