रायगड - करपा रोगमुळे भाताचे पिक जळाले 

लक्ष्मण डूबे 
मंगळवार, 24 एप्रिल 2018

रसायनी (रायगड) : रसायनी परिसरातील वासांबे मोहोपाडा येथील शेतकऱ्यांच्या निसवलेल्या उन्हाळी भात पिकावर करपा रोग पडल्याने पिक जळुन गेले आहे. हाता तोंडात आलेला घास वाया गेल्याने  चिंतातुर झालेले शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. 

मोहोपाडा येथील वामन दळवी, अनंत मुंढे, महेंद्र धुरव आदी शेतकऱ्याच्या शेतातील ऊन्हाळी निसवलेल्या पिकावर करपा रोग पडल्याने उभ पिक जळुन गेले आहे. या वर्षी खराब हवामानामुळे लवकर पिकावर रोग पडला आहे. असे सांगण्यात आले. 

सुरवातीला दोन शेतकऱ्याच्या शेतात करपा  रोग पडला होता. रोगाचा नायनाट करण्यासाठी रासायनिक खतात किटक नाशक औषध मिसळुन टाकली आणि फवारणी सुध्दा केली. मात्र उपयोग झाला नाही रोगाचा फैलाव वाढत गेला. आणि बहुतेक शेतकऱ्यांच्या पिकावर रोग पडला असल्याचे अनंत मुंढे व इतर शेतकऱ्यांनी सांगितले. येथील शेतकऱ्याचे सुमारे एेंशी टक्के पिक करपा रोगमुळे जळुन गेले आहे. दरम्यान पिक वाया गेले असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. तर बियाणे खराब असल्यामुळे रोग पडला आसावा आशी शक्यता जागृत शेतकऱ्यांनी  व्यक्त केली आहे.  

Web Title: due to karpa decease on crops they get burned in rasayani raigad