वाढत्या उष्म्यामुळे रोपवाटीकाधारक चिंतातूर

अमित गवळे
बुधवार, 30 मे 2018

पाली - जिल्ह्यात वाढत्या उष्म्यामुळे सर्वच त्रस्त झाले आहेत. अती उष्म्यामुळे रोपवाटीका धारकही चिंतातूर झाले आहेत. उष्म्यामूळे रोपवाटिकेतील रोपे व झाडे सुकत आहेत. त्यामुळे रोपवाटीका धारकांना नुकसान सहन करावे लागत आहे.

पाली - जिल्ह्यात वाढत्या उष्म्यामुळे सर्वच त्रस्त झाले आहेत. अती उष्म्यामुळे रोपवाटीका धारकही चिंतातूर झाले आहेत. उष्म्यामूळे रोपवाटिकेतील रोपे व झाडे सुकत आहेत. त्यामुळे रोपवाटीका धारकांना नुकसान सहन करावे लागत आहे.

पावसाळा सुरु झाल्यावर सर्वत्र रोपवाटीका सजतात. मात्र सध्या उष्म्यामुळे रोपवाटिकेत असलेल्या विवीध शोभीवंत, फळ आणि फुलझाडांच्या रोपांचा निभाव लागत नाही. त्यामुळे रोपवाटीकेत शिल्लक असलेली ही रोपे व झाडे वाचविण्यासाठी रोपवाटीकाधारक प्रचंड प्रयत्न करत आहेत. ज्या ठिकाणी पुरेसे पाणी उपलब्ध आहे तेथे वारंवार या रोपांवर पाणी मारले जाते. मात्र पाण्याची कमतरता भेडसावत असेल तर मात्र रोपे अपुर्या पाण्यामूळे सुकतात. अनेक वेळा वारंवार पाणी मारुन देखिल फारसा उपयोग होत नाही. कारण उष्म्यामुळे पाण्याची लगेच वाफ होते. उन्हापासून रोपांचे संरक्षण व्हावे यासाठी रोवाटिका धारक काही ठिकाणी ग्रीन नेटचा वापर करतात. यामुळे झाडांना थोडी सावली मिळते पण उष्मा कायमच राहतो. 

वारंवार या सुकलेल्या झाडांची कटिंग करुन योग्य देखभाल करावी लागते. या सगळ्यासाठी खुप वेळ व पैसा खर्च करावा लागतो. त्याचबरोबर मेहनतही घ्यावी लागते. त्यामुळे कधी एकदा पावसाळा सुरु होतोय या आशेवरच रोपवाटिकाधारक आहेत. 

उन्हाळ्यात रोपवाटीकेतील झाडांची खुप देखभाल व काळजी घ्यावी लागते. पाणी उपलब्ध नसेल तर दुरवरुन पाणी आणावे लागते. लहान रोपे अती उष्मा व पाण्या अभावी मरतात. त्यामुळे खुप नुकसान होते. उन्हाळ्यात रोपांना व झाडांना मागणी कमी असली तरी काही प्रमाणत रोपे नर्सरीत ठेवावीच लागतात. त्याचबरोबर अगोदरची न विकलेली रोपे व झाडे देखिल नर्सरीत असतात. परिणामी वाढत्या उष्म्यामूळे हि रोपे व झाडे टिकविणे जिकरीचे होऊन जाते. 
अमित निंबाळकर, ग्रीन टच लँडस्केप अँड नर्सरी

Web Title: Due to the rising heat, the nursery owner worries

टॅग्स