रायगड- MIDC मध्ये स्फोट; 4 जखमी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

रायगड- अज्ञात कारणांमुळे रायगड जिल्ह्यातील धाटाव औद्यागिक वसाहतीच्या (MIDC) परिसरामध्ये एका कंपनीत स्फोट झाला. त्यामध्ये चारजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. 

दीपक नायट्रेट या कंपनीत हा स्फोट झाल्यामुळे आगीचा मोठा भडका उडाला. आगीचा लोट मोठ्या उंचीपर्यंत जात असल्याने आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले होते. आगीचा भडका दूरपर्यंत दिसत होता. 

जखमींपैकी तिघे किरकोळ जखमी झाले असून, एकावर उपचार करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. येथील अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली असल्याचे सांगितले. 
 
टॅग्स