पालीत ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप

pali
pali

पाली (रायगड) : ढोल-ताशाच्या गजरात पाच दिवसाच्या गणरायाला व गौरीला सोमवारी (ता. 17) भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. येथील आंबा नदी घाटावर तसेच काही तलावांवर घरगुती व सार्वजनिक गणरायाचे विसर्जन मोठ्या भक्तीमय व उत्साही वातावरणात करण्यात आले.

ढोलताशांच्या व पारंपारीक वाद्याच्या गजरात, गुलालाची उधळण करत गणरायाची भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत तरुण तरुणींसह सारेच ठेका धरुन नाचत होते. गणेशोत्सवादरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पाली पोलिसांचा सर्वत्र कडेकोट बंदोबस्त होता. पाली खोपोली राज्यमहामार्गासह पालीत सतत होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहातुक पोलीस तैनात करण्यात आले होते. पोलीसांना नागरिकांचे देखील मोठे सहकार्य लाभले. सुधागड तालुक्यातील अनेक गणेशमुर्तींचे विसर्जन गावाच्या जवळील नदी व तलावात करण्यात आले. यावेळी विसर्जनस्थळी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. अष्टविनायक देवस्थानापैकी प्रख्यात धार्मिक स्थळ असलेल्या पाली बल्लाळेश्वर मंदीर देखिल मागील अाठवडाभर भाविकांनी गजबजले आहे.

शांतता व सुरक्षिततेच्या दृष्टीने रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर व पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पाली पोलीस निरिक्षक रविंद्र शिंदे यांनी चोख व कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. याबरोबरच दिवसा व रात्री पाली शहरात व सुधागड तालुक्यात पोलीस व्हॅन सतत गस्त घालत होती. विसर्जनस्थळी स्वच्छता व विज व्यवस्थेबरोबरच अन्य सेवासुविधा प्रशानामार्फत पुरविण्यात आल्या होत्या. पाली सुधागड तहसिलदार बि.एन. निंबाळकर यांनी देखिल गणेशोत्सवादरम्यान शासन प्रशासनाला आवश्यक सुचना देत उपाययोजना सुचविल्या होत्या. विसर्जनस्थळी जिवरक्षकांसह पोलीस तैनात करण्यात आल्याने गणेशभक्तांना सुरक्षित विसर्जन करता आले. शासन प्रशासनाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमिवर केलले योग्य नियोजन तसेच नियमांचे पालन करीत शांतता, सलोखा व एकोपा राखत उत्सव साजरा करण्यासाठी नागरीकांनी स्वयंस्फुर्तीने घेतलेला पुढाकार यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com